पुणे-
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांसाठी काम करताना धर्म,जाती,पंथ भेद न बाळगता काम करण्यावर भर दिला होता,त्यालाच अनुसरून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते काम करतात असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.हिंदू संस्कृती म्हणजे सर्वांच्या प्रती स्नेह ,प्रेम व आदराचा समुच्चय असेही ते म्हणाले.आज अटलजींच्या जयंतीनिमित्त नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या विकासनिधीतून आणि संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या दिव्यांग आधार केंद्राच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी मंजुश्री खर्डेकर यांच्या विविधांगी विकास प्रकल्पांचे कौतुक करताना ” १०/१५ नगरसेवकांचा गट करुन त्यांच्या माध्यमातून असे आधार केंद्र उभारले जावेत व शहरभर असे केंद्र उभारले तर नागरिक ही तेथे खरेदी करतील व दिव्यांगांच्या सक्षमीकरणाचा तो एक महत्त्वाचा टप्पा ठरेल ” अशी सूचना ही त्यांनी केली.दिव्यांग केंद्राला भेट देताना दादांनी अनेक वस्तू विकत घेतल्या व उपस्थित नागरिकांसमोर एक आदर्श निर्माण केला.वस्तू खरेदी करताना त्यांनी माहिती घेतली की या विक्रीतील १०% रक्कम केंद्राच्या व्यवस्थापनासाठी मनपा कापून घेते – यावर त्यांनी त्वरित महापौरांना ही रक्कम कापू नये व मनपानेच १०% अनुदान द्यावे अशी सूचना केली.दिव्यांगांना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूची पूर्ण किंमत मिळावी असेही ते म्हणाले.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ,नगरसेविका व कार्यक्रमाच्या संयोजक मंजुश्री खर्डेकर,स्थानिक नगरसेवक दीपक पोटे,जयंत भावे,माधुरीताई सहस्त्रबुद्धे,मिताली सावळेकर,बापूसाहेब मेंगडे ,मनपा उपायुक्त नितीन उदास ,सुनील इंदलकर,प्रशांत हरसुले,गौरी करंजकर ,सुवर्णा काकडे,संगीताताई शेवडे ,संगीताताई आदवडे ,सुलभा जगताप ,माणिकताई दीक्षित,अपर्णा लोणारे ,अमोल डांगे ,जाग्रुती कणेकर ,रुपालीताई मगर ,मंगलताई शिंदे ,घाणेकर आजी ,हेमंत भावे ,जगदीश डिंगरे ,कीर्ती गावडे ,रामदास गावडे ,प्रमिलाताई फाले ,इ उपस्थित होते.
चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेल्या सूचनेनुसार यापुढे दिव्यांगांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीवरील १०% देखभाल खर्च पुणे मनपा करेल व तशी तरतूद त्वरित करु असे महापौर मोहोळ यांनी जाहीर केले.तसेच दारिद्र्य निर्मूलनासाठीच्या बजेट मधून ५% रक्कम ही दिव्यांगां साठी खर्च करावी असे धोरण आहे ,मात्र वेळ पडल्यास ही रक्कम दुप्पट करु आणि दिव्यांगांसाठीच्या योजनां साठी निधीची कमतरता भासू देणार नाही असेही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
प्रभागातील मनपाच्या ताब्यातील फ्लॅट चा वापर होत नसल्याचे लक्षात आल्यावर मी त्यासाठी निधी ची तरतूद केली व याचे नूतनीकरण करुन येथे दिव्यांगांसाठीचे आधार केंद्र म्हणजेच दिव्यांगांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे विक्री केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.हे केंद्र उभारताना दिव्यांगांना सहानुभूतीची नव्हे तर आधाराची आणि त्यांच्यातील अंगभूत कौशल्याला प्रोत्साहनाची गरज असल्याचे माझ्या लक्षात आले आणि त्यानुसार हे केंद्र उभारल्याचे त्यांनी स्पष्ट केले.केंद्र उभारताना मनपा चे उपायुक्त नितीन उदास समाज विकास विभागाचे प्रमुख सुनिल इंदलकर , श्री महाजन,श्री खुळे व सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी संपूर्ण सहकार्य केले व या विषयाकडे संवेदनशीलतेने बघितले याचे समाधान वाटते असे ही मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.आता जबाबदारी नागरिकांची असून त्यांनी येथे खरेदी केल्यास त्याचा दिव्यांगां ना मोठा आधार होइल असे आवाहन ही मंजुश्री खर्डेकर यांनी केले.
या केंद्रात साद ,अपंग कल्याणकारी संस्था,एनेब्लेयर चॅरिटेबल ट्रस्ट ,सेवासदनचे दिलासा केंद्र ,प्रहार अपंग संघटना यासह विविध अपंग संस्थांची उत्पादने एकाच ठिकाणी मिळण्याचे हे पुण्यातील एकमेव अभिनव केंद्र असल्याचे ही मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.
दिव्यांगां नी उत्पादित केलेल्या वस्तु भेट देउन एनेब्लेयर ट्रस्ट चे अमोल शिनगारे व मंजुश्री खर्डेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप खर्डेकर यांनी केले तर सुनील इंदलकर यांनी आभार प्रदर्शन केले.