पुणे-पुणेकरांनी ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टीला पुणे मनपा ची सत्ता सोपविली त्यास आमचे नगरसेवक वचननाम्याची पूर्तता करून आपली निवड सार्थ असल्याचे सिद्ध करत आहेत,त्याच कडीतील आजचा नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांचा कार्यक्रम असून प्रभागातील नागरिकांना जे अपेक्षित आहे तेच काम करण्यावर आम्ही भर दिला आहे,आज गुडीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मी आपल्याला ग्वाही देते कि आमचे काम हे नागरिकांना केंद्रबिंदू मानून सुरु आहे व आम्ही आपल्या सर्व अपेक्षा निश्चितच पूर्ण करू.असा दावा महापौर मुक्ता टिळकयांनी येथे केला.
नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या बजेट तरतुदीतून योग केंद्र व लहान मुलांसाठी वाचनालयाच्या इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या.” आम्ही पारदर्शी कारभारावर भर दिला असून त्यामुळे अस्वस्थ झालेले विरोधक आमच्यावर टीका करत आहेत,मात्र आम्ही सर्वांगाने विचार करून ऑनलाईन खरेदी सह,सुरक्षा रक्षकांमध्ये कपात करणे,सार्वजनिक वाहतुकीचे सक्षमीकरण करणे,नागरिकांना बहुतांश सुविधा ऑनलाईन उपलब्ध करणे यासारखे निर्णय घेतले आहेत असे ही त्यांनी सांगितले.यावेळी कार्यक्रमाच्या संयोजिका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या ” मी माझ्या वचननाम्यात योग केंद्र उभारणार असे म्हंटले होते,भाजप च्या शहराच्या वचननाम्यात देखील याचा अंतर्भाव होता,त्यामुळेच गत ८ महिने सातत्याने पाठपुरावा करून करिष्मा सोसायटी शेजारील ह्या अमेनिटी स्पेस च्या जागेत आता टुमदार योग केंद्र व लहान मुलांसाठीचे वाचनालय उभे राहणार आहे,योग केल्याने आपले शरीर तर तंदरुस्त राहतेच पण मन ही आनंदी व प्रफुल्लित होते याचा अनुभव असल्याने प्रभागात योग केंद्र उभारण्यास प्राधान्य दिले,तसेच लहान मुले खूपच मोबाईलच्या आहारी गेली आहेत त्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी येथे एका भागात बाल वाचनालय देखील असणार आहे,वर्षपूर्ती होत असताना मी माझ्या जाहीरनाम्यातील बहुतांश वचने पूर्णत्वास आणली आहेत असे ही मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.यावेळी प्रभागातील नगरसेवक दीपक पोटे,माधुरीताई सहस्रबुद्धे,जयंत भावे,भाजप चे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर,राजेंद्र येडे,सुवर्णाताई काकडे,राज तांबोळी,अनुराधा एडके,सुलभाताई जगताप,निलेश घोडके,निलेश गरुडकर,माणिकताई दीक्षित,सुमित दिकोंडा,यांच्यासह संगम प्रेस चे समीर शाह,आर्किटेकट अतुल दिवाने, सुधीर नाईक (पुष्पकांत सोसायटी)मा किशोर भट्ट्ड ( चिनार सोसायटी) , हेमंत चक्रदेव (करिश्मा सोसायटी) जयंत जोशी (अवंतिका सोसायटी) शांतप्पा एंडिगिरी शीलाताई वरखेडकर (तेजलकुंज ) दीपक आशर (गौरव सोसायटी) सुरेश कुलकर्णी (संगमश्री ) रवी जोशी (रेल्वे म्युझिअम)नानिवडेकर,श्रीरं ग उमराणी(सिद्धार्थ टॉवर्स) जगदीश खेर (अनुशा ) गणेशवाडे(श्रीकृष्ण इंजिनिअरिंग) श्री ढोणसाळे (ऐश्वर्या )सौ शोभा काळे सौ.वीणा चव्हाण (पुष्पकांत ) श्री. अनिल काळे (सदाफुली १) असे विविध सोसायट्यांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सर्वांशी महापौर मुक्ता टिळक,भाजप चे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर व सर्व नगरसेवकांनी मुक्त संवाद साधला.यावेळी विविध सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले तर महापौर व प्रभागातील चार ही नगरसेवकांनी एकत्र कुदळ मारून या वास्तूच्या उभारणीचा श्रीगणेशा केला.यावेळी महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते भाजपचे हडपसर मतदारसंघाचे विस्तारक कुलदीप सावळकर व कोथरूड मतदारसंघाचे विस्तारक पुनीत जोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला,तसेच संगम प्रेस चे समीर शाह,आर्किटेकट अतुल दिवाने,मनपाचे अभियंता सुनील मोहिते,मनपाच्या रुचिता बावनकर,कंत्राटदार सुदर्शन थोरात,तसेच वैष्णवी घोडके यांचा ही सत्कार करण्यात आला.
नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक तर संदीप खर्डेकर यांनी सूत्र संचालन व आभार प्रदर्शन केले.