पुणे-क्रीएटिव्ह फौंडेशन आणि की.विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान ने आयोजित केलेल्या १४ दिवसीय शिवजयंती महोत्सवाची सांगता काल रात्री छ.शिवाजी पुतळा चौक कोथरूड येथे लकी ड्रो सोहोळ्याने झाली.यावेळी श्रीमती सीता वासुदेव पवार यांनी प्रथम क्रमांकाचे लकीड्रो बक्षीस जिंकले,त्यांना पालकमंत्री गिरीश बापट,आ.मेधा कुलकर्णी,आ.जगदीश मुळीक,संयोजक संदीप खर्डेकर,विशाल भेलके,उमेश भेलके,सौ.मंजुश्री खर्डेकर यांच्या हस्ते टी.व्ही.एस.ज्युपिटर दुचाकी देण्यात आली.अन्य बक्षिसी मा.खा.अनिल शिरोळे,मा.योगेश गोगावले,मा.रवी अनासपुरे,मा.उत्तम भेलके,सुर्यादत्त ग्रुप चे संजय चोरडिया,कन्नड संघाचे कुशल हेगडे,लिज्जत पापड चे सुरेश कोते यांच्या हस्ते देण्यात आले. तर द्वितीय क्रमांकाचे वुडन कपाट सौ.अनिता कोरडे,तृतीय क्रमांकाचे ड्रेसिंग टेबल सौ.रुपाली किरण किरमीटे यांनी जिंकले.चतुर्थ क्रमानाचे मोबाईल मंदा सुनील पवार,पाचवे सी.डी.प्लेयर पूजा नवगिरे,सहाव्या क्रमांकाचे कम्प्युटर टेबल माधुरी अशोक खानोरे,सातवे बक्षीस मिक्सर शीतल भंडारी,आठवे बक्षीस टी.पाय रंजना मालुसरे,नववे बक्षीस खुर्ची रोहिणी तिकोने,तर दहाव्या क्रमांकाचे मोबिल कीट सौ.रेणू माग्गो यांनी जिंकले.या व्यतिरिक्त ११ पैठण्या ही या लकी ड्रो द्वारे देण्यात आल्या.या कार्यक्रमास ५००० महिला उपस्थित होत्या.
सर्वच विजेत्या महिलांनी आनंद व्यक्त करताना “आमच्या रुक्ष ,रुटीन जीवनात आनंद फुलविल्याबद्दल संयोजकांचे आभार अशी भावना व्यक्त केली,तर काही महिलांनी आपले स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले,पैठणी जिंकलेल्या एका सुनेने आपल्या सासूला पैठणी भेट दिली तर एका मुलीने आई ला,बक्षीस जिंकनार्यांच्या डोळ्यातील अश्रू सर्व काही सांगून जात होते.कौटुंबिक नात्यातील विविध पैलू या कार्यक्रमात उलगडत गेले.संदीप खर्डेकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.
शिवरायांचे विचार ही दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन करतानाच शिव्जन्मोत्सवानिमित्त कीर्तन महोत्सव ,पोवाडे व अन्य कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल ना.गिरीश बापट यांनी संयोजकांचे अभिनंदन केले तर खा.अनिल शिरोळे यांनी शिवजयंती महोत्सव तब्बल १५ दिवस आयोजित करून क्रीएटिव्ह फौंडेशन ने शिवरायांचे विचार लोकांपर्यंत पोचविल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
या वेळी आ.जगदीश मुळीक व आ.मेधा कुलकर्णी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
या महोत्सवात ८ दिवस कीर्तन महोत्सव व तद्नंतर लावणी,महिलांचा पोवाडा,भारुड,महाराष्ट्राची लोकधारा,सण्ड एण्ड आर्ट शो,यासह विविध कार्यक्रमांना कोथरूड करांनी भरभरून प्रतिसाद दिला.शिवजयंती दिनी शिव छत्रपतींची सवाद्य भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.कार्यक्रमाचे संयोजन संदीप खर्डेकर,विशाल भेलके,व सौ.मंजुश्री खर्डेकर यांनी केले.



