१४ हजार क्युसेक पाणी मुठेला ……
पुणे- खडकवासला फुल्ल भरल्याने , धरणाचे सकाळी २ + २ = ४ दरवाजे उघडले अन मुठा नदी वाहती झाली दुपारी आणखी दरवाजे उघडून नदीत पाणी सोडण्यात आले . मुठेला नदीचा सन्मान प्राप्त झाला ..मुठामाई अवतरली ..संध्याकाळी 5 वाजेपर्यंत १४ हजार क्युसेक एवढे पाणी खडकवासल्यातून मुठा नदीत सोडण्यात येत होते .
आज सोमवारी (16 जुलै) सकाळी ८ वाजता मुठा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली .प्रथम २ दरवाजे १ फुटाने उघडण्यात आले. नंतर आणखी दोन दरवाजे दहा वाजता उघडण्यात आले तेव्हा धरणातून ३ हजार ४३४ क्युसेस पाणी सोडण्यात येत होते. . दुपारी १ वाजता पुन्हा दरवाजे उघडण्यात येणार होते आणि आणखी पाण्याचा विसर्ग होणार होता ..एकंदरीत मुठामाई बहरणार आज .. दोन्ही रस्ते आणि नदीवरचे छोटे पूल हे काही काळा पुरते का होईनात दक्षता म्हणून बंद करावे लागणार असे चित्र होते .
सकाळपर्यंत खडकवासला धरणात २७, पानशेत ९०, वरसगाव ८९, टेमघर १०७ मिमी पावसाची नोंद झाली होती. सध्या खडकवासला धरण १०० टक्के भरले असून पानशेत ७३ टक्के, वरसगाव ४६ टक्के, टेमघर ४६ टक्के भरले आहे. धरण परिसरात जोरदार पाऊस सुरु राहिल्यास व धरणांमध्ये पाण्याची आवक वाढल्यास नदीत पाणी सोडण्याच्या प्रमाणात वाढ करण्यात येणार आहे. खडकवासला धरणातून ८ हजार क्युसेस पाणी सोडल्यास नांदेड गावाजवळील पुल पाण्याखाली जातो. तर २० हजार क्युसेस पाणी सोडल्यास डेक्कन जिमखान्यावरील भिडे पुल पाणी खाली जातो.पहा यासंदर्भात प्रत्यक्ष धरणावरील व्हिडीओ रिपोर्ट पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या अधिकृत मुलाखतीसह …