पुणे- सलग आणि सातत्याने सुरु असलेल्या पावसाने गेल्या वर्षाच्या तुलनेत मुसंडी मारली. आज सायंकाळी खडकवासला धरण १०० टक्के भरले या धरणातून मुठा नदीत ११९०० क्युसेस एवढे पाणी सोडले जाते आहे तर उजव्या कालव्यात ९०५ क्युसेस पाणी सोडले जाते आहे.खडकवासल्यात सुमारे २ टीएमसी (उपयुक्त १.९७ टीएमसी ) पाण्याचा साठा झाला आहे. आज या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज २४ मिमी (आजवर २४९ मिमी ) पाउस झाल्याची नोंद झाली आहे अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे उपभियांता योगेश भंडलकर यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
ते म्हणाले,’ पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज४० मिमी (आजवर ९२८ मिमी ) पाउस झाल्याची नोंद झाली आहे. या धरणात ४.०८ टीएमसी (३८.३० टक्के )पाणी साठा झाला आहे .
वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज ३६ मिमी (आजवर ८८९ मिमी ) पाउस झाल्याची नोंद झाली आहे. या धरणात ४.६० टीएमसी (३५ .९१ टक्के )पाणी साठा झाला आहे .
टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज १०० मिमी (आजवर १११३ मिमी ) पाउस झाल्याची नोंद झाली आहे. या धरणात ० .९१ टीएमसी (२४ .६१ टक्के )पाणी साठा झाला आहे .
या चार धरणांचा उपयुक्त पाणीसाठा ११.५७ टीएमसी झाला आहे. मागील वर्षी हा साठा ८.३२ टीएमसी होता. मागील वर्षापेक्षा हा ३ टीएमसी जास्त साठा आहे.
Subject: khadakwasala Complex gauges 12.7.2022/5.00 pm,
Rain(mm/Total/TMC/%/Inflow/Mtr)
1)Khadakwasala –
24/249/1.97/100%/+117/582.47
NMRBC- 905
ww-11900
Total water released over spillway KDK dam =0.02 TMC till now.
2)Panshet– 40/928/4.08/38.30%/+264/620.79
PH-00
ww-00
LLIO-00
3)Warasgaon–
36/889/4.60/35.91%/+299/623.30
ww-00
PH–00
HLIO-00
LLIO-00
4)Temghar–
100/1113/0.91/24.61%/+101/ 682.70
ICPO– 00
ww–00
PH–00
Total Inflow 4 Dam= 781 mcft
Total contents of 4 Dams-
11.57 TMC/39.69%
Last year-
8.62 TMC/ 29.56%

