अन्न व औषध विभागाच्या स्थलांतरास खा.बापट यांचा विरोध

Date:



पुणे,दि.30 ( प्रतिनिधी ) : अन्न व औषध विभागाची प्रशासकीय कार्यालये मोशी येथे हलविण्यास खासदार गिरीश बापट यांनी विरोध दर्शविला असून ही कार्यालये शहराच्या मध्यवर्ती परिसरात हलवावीत. अशी मागणी त्यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे केली आहे.
पालिकेने त्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी सूचनाही बापट यांनी गुरूवारी एका निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांकडे केली आहे.त्यात म्हटले आहे की, गुरुवार पेठेत असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न विभागाच्या कार्यालयाचे औंधला झालेल्या स्थलांतरामुळे विक्रेत्यांसह व्यावसायिकांची गैरसोय झाली आहे. सध्या नव्याने औंध येथील कार्यालय मोशी येथे पुणे व पिंपरी चिंचवड या दोन्ही शहराच्या विरुद्ध दिशेला स्थलांतरीत करण्याबाबत प्रशासनाची कार्यवाही सुरु असल्याचे समजते.
पुणे शहरात मोठ्या प्रमाणात असलेले छोटे मोठे खाद्य विक्रेते, हॉटेल, ढाबे, हातगाड्या त्यांना आवश्यक असणारे परवाने तसेच त्यांची तपासणी व आपल्या विभागात असणाऱ्या विविध कामानिमित्त नागरिकांना वेळोवेळी औंध कार्यालयात ये-जा करावे लागते. त्यामुळे मोशी येथे सदर प्रशासकीय कार्यालय स्थलांतरीत झाल्यास नागरिकांचा आर्थिक व वेळेचा अपव्यय होणार असून त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे प्रयोगशाळा आणि गोडाऊन वगळता अन्न व औषध प्रशासन विभागाचे कोणतेही प्रशासकीय कार्यालय मोशी येथे स्थलांतरीत करू नये अशी नागरिकांची मागणी आहे. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करता अन्न व औषध प्रशासन विभागाची प्रशासकीय कार्यालये पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असणे आवश्यक आहे.
तरी शहरातील लाखो व्यावसायिकांसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाची प्रशासकीय कार्यालये मोशी येथे स्थलांतरीत न करता पुणे शहरात मध्यवर्ती भागातच सुरु ठेवावीत. एका पत्रकाद्वारे खा.बापट यांनी ही माहिती दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...

पुण्यात एकाच वेळी ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम संपन्न

जल संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचे पुण्यामध्ये विशाल स्वच्छता...

शरद पवार यांची प्रकृती पुन्हा खालावली:डिहायड्रेशनमुळे अशक्तपणा, पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात दाखल

पुणे:राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पवार...

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून:विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार; अजित पवारांच्या अपघाताबाबत संशय

सत्ताधारी पक्ष मस्तीमध्ये असल्याची टीका,घरगुती डिजिटल मीटरचा विरोध,सोलार...