पुणे: थेट विक्री अर्थात डायरेक्ट सेलिंग नेटवर्क क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी असलेल्या क्यू नेट ने वॉटरप्युरीफायर आणि होम अप्लायन्सेस क्षेत्रातील आघाडीची कंपनी केंट सोबत सहकार्य करार करून ‘केंट क्यू नेट स्मार्ट अल्कलाईन मिनरल आर ओ’ वॉटरप्युरीफायर दाखल केला आहे. हा वॉटरप्युरीफायर खास ‘क्यू नेट’ साठी विकसित करण्यात आला आहे.
अलीकडेच राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेतर्फे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात पुणे, सातारा, सोलापूर भागात पाणी प्रदुषणाचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.पुणे शहर हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असून आशिया पॅसिफिक प्रदेशातील एक वेगाने वाढणारे शहर आहे. पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणचे पिण्याच्या पाण्याचे १२२३ नमुने घेऊन त्याचे विश्लेषण करण्यात आल्यानंतर,पाणी प्रदूषण २१ टक्के असल्याचे आढळले. पुणे आणि सोलापूर शहरातील विविध गावांमधील पिण्याच्या पाण्यातील प्रदूषण तर उच्च पातळीवर पोहोचल्याचेही स्पष्ट झाले आहे. यावरून पाणी प्रदुषणाची समस्या गंभीर पातळीवर पोहोचल्याचे स्पष्ट होते. स्वच्छता, पाणी प्रदूषण या बाबतीत काम करणाऱ्या वॉटरएड या जागतिक पातळीवरील संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार, भारतातील ८० टक्के भूजल प्रदूषित असल्याचे आढळले आहे. बहुसंख्य जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नसलेल्या देशांच्या यादीत भारताचा क्रमांक वरचा आहे. आपल्या देशातील पिण्याच्या पाण्यात २०० प्रकारची व्यावसायिक रसायनांसह विषाणू, जीवाणू आणि अन्य असेंद्रीय घटक आढळतात, ज्यामुळे हे पाणी पिण्यासाठी अत्यंत घातक ठरते.
या पार्श्वभूमीवर, केंट आणि क्यू नेट यांची ही भागीदारी महत्त्वाची ठरते.
केंट क्यू नेट वॉटरप्युरीफायर मध्ये मिनरल रिव्हर्स ऑसमोसीस (आर ओ) , अल्ट्रा व्हायोलेट (युव्ही) आणि अल्ट्रा फिल्टरेशन अशा तीनही प्रकियांचा समावेश आहे, त्यामुळे केवळ स्वच्छ नव्हे तर आवश्यक खनिजे आणि योग्य पीएच पातळी राखलेले शुद्ध , आरोग्यदायी पाणी मिळते.
याबाबत केंट आर ओ सिस्टीम्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महेश गुप्ता म्हणाले, ‘देशातील वॉटरप्युरीफिकेशन व्यवसाय वार्षिक १५ टक्के (सीएजीआर ) दराने वाढत आहे. अर्थात अजूनही अशा वॉटरप्युरीफायरची व्याप्ती खूपच कमी ,केवळ ३ टक्के इतकी आहे. महानगरांमध्ये पिण्यासाठी सुरक्षित पाण्याबाबत मोठ्या प्रमाणात जागरूकता आहे. लहान शहरांमध्ये अद्यापही पाणी उकळून पिणे ही सुरक्षित पद्धत मानली जाते. क्यू नेट या डायरेक्ट सेलिंग नेटवर्कचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात अशा लहान शहरांमध्ये आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष सादरीकरण दाखवून ग्राहकांपर्यंत पोहोचणे आम्हाला शक्य होईल. यामुळे शुद्ध, सुरक्षित पिण्याच्या पाण्याबाबत जागरुकता निर्माण करणे सोपे होईल; तसेच थेट ग्राहकांकडून प्रतिसादही कळू शकेल’.
‘केंट- क्यू नेट’ वॉटरप्युरीफायरची वैशिष्ट्ये
· मिनरल रिव्हर्स ऑसमोसीस (आर ओ) , अल्ट्रा व्हायोलेट (युव्ही) आणि अल्ट्रा फिल्टरेशन तंत्रज्ञानामुळे घातक रसायने, जीवाणू, विषाणू, क्षार विरघळवणे शक्य होते आणि १०० टक्के शुद्ध पाणी मिळते.· टीडीएस कंट्रोलर युक्त पेटंटेड मिनरल रिटेन्शन तंत्रज्ञानामुळे पाण्यातील आवश्यक खनिजे शुद्धीकरण केलेल्या पाण्यात कायम राखली जातात. · पीएच पातळी ८ पेक्षा अधिक ठेवली जात असल्याने अल्कलाईनयुक्त आरोग्यदायी पाणी मिळते · तासाला २० लिटर पाणी शुद्ध करण्याची क्षमता· टँपरप्रूफ आर ओ मेम्ब्रेनमुळे सुरक्षिततेची हमी · स्मार्ट इंटेलीजंट सेन्सर्सयुक्त टच स्क्रीन डिस्प्ले मुळे पाणी शुद्धीकरणासाठी लागणारा वेळ ,कार्यक्षमता, सर्व्हिसची माहिती मिळते · ९ लिटरचा स्टोअरेज टँक · एक वर्षाची वॉरंटी
याबाबत क्यू नेट लिमिटेडचे जागतिक पातळीवरील सीईओ ट्रेव्होर कुना म्हणाले, ‘ आजच्या काळातील जीवनशैलीतील अनेक आव्हानांशी उदाहरणार्थ पिण्याचे अशुद्ध पाणी, अशुद्ध हवा, ताण त्यामुळे शरीरावर होणारे परिणाम याची दखल घेऊन त्यावर मात करण्यास उपयुक्त ठरतील अशा सेवा, उत्पादने देण्यावर कंपनी भर देते. भारतातील पाणी शुद्धीकरण क्षेत्रात क्रांती घडवणारे डॉक्टर महेश गुप्ता यांच्यासह केंटसमवेतच्या या भागीदारीमुळे आम्ही खूप उत्साहीत आहोत. क्यू नेटच्या विस्तृत जाळ्याचा उपयोग करून केंटचे हे अभिनव उत्पादन देशातील मोठ्या शहरांमध्येच नव्हे तर, छोट्या गावांमध्येही पोहोचेल. आणि अनेकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध होईल,अशी मला खात्री आहे.