मानसिकदृष्ट्या सक्षम बनण्यासाठी सकारात्मक जीवनपद्धती अवलंबण्याची आवश्यकता:प्रा. चेतन दिवाण

Date:

पुणे: आपले मानसिक आरोग्य उत्तमरीत्या जोपासण्यासाठी आपण स्वतःच अनेक उपाय – योजनांची आखणी करू शकतो त्यामुळे विशेषतः महाविद्यालयीन युवक – युवतींनी  एखाद्या गोष्टींपासून खचून न जाता त्याला सामोरे जात त्यामधून योग्य तो मार्ग काढण्यासाठी सकारात्मक जीवनशैलीचा अवलंब करावा व स्वतःच स्वतःला मानसिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करावेत असे मत महाराष्ट्र राज्य मानसिक आरोग्य जनजागरण समितीचे समन्वयक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष प्रा. चेतन दिवाण यांनी बावधन येथील सुर्यदत्त शिक्षण संस्था समूहाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेमध्ये युवकांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

पुणे येथील बावधन मधील सुर्यदत्त शिक्षण संस्था समूहाच्या वतीने एकदिवसीय “ नॉलेज मॅनेजमेंट इनिशिएटिव्ह कार्यक्रमाचे” आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते उत्तम निरोगी मानसिक आरोग्य या विषयी प्रा. चेतन दिवाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विभागाच्या डीन प्रा. उज्वला वाबले या होत्या तर प्रा. अर्चना वाफगावकर व प्रा. दीपाली देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

आजकालच्या धकाधकीच्या जीवनामधील बदलत्या जीवनशैलींमुळे निर्माण होत असलेली युवकांची नकारात्मक विचारसरणी, अनपेक्षित भावनिक गुंतागुंत, मित्र – मैत्रिणी, पालक व परीजनांकडून असणारे अपेक्षांचे ओझे व त्यामुळे होणारे अपेक्षाभंग आणि त्यामुळे उद्भवणारे नैराश्य या व अशा अनेक समस्यांना सामोरे जात असताना युवकांच्या मनाची होणारी द्विधावस्था टाळण्यासाठी महाविद्यालयीन युवकांनी उत्तम मानसिक आरोग्य जोपासणे आवश्यक असून त्यासाठी त्यांनी आपल्या शारीरिक, भावनिक, सामाजिक, अध्यात्मिक व मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन देखील प्रा. दिवाण यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रा. दिपाली देसाई यांनी स्वागत केले प्रा. अर्चना वाफगावकर यांनी प्रास्ताविक केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सनत पंडित यांनी केले तर आभार वैभवी लोणकर यांनी मानले

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींना धमकी देणाऱ्या राज आमेरावर कारवाईची मागणी: काँग्रेसचे निषेध आंदोलन

पुणे: शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालगंधर्व चौकात निषेध...

आता २२ राज्यांमध्ये नागरिकत्व सिद्ध करावे लागणार,एसआयआर,बोगस मतदारांना वगळणार

पुणे (prab)- तब्बल २१ वर्षांनंतर नव्याने मतदार यादी तयार होणाऱ्...

पुण्यात एकाच वेळी मुळा, मुठा, खडकवासला धरणासह एकूण ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम

संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम: ‘प्रोजेक्ट अमृत’चा...

भिवंडी महापौर निवडणुकीत बंडखोरी करणा-यांवर कारवाई:भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची घोषणा

भिवंडी: भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पक्षादेशा (व्हीप) विरोधात...