पुणे – महिला उद्योजीकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वताच्या जिवनातील जडणघडण अनुभव तसेच महत्वाचे किस्से व टीम मंजमेंट ,संघटन कौशल्य आदी माहिती आणि आठवणी व्यक्त करीत फिक्की, महिला विंग,आयोजित कार्यक्रमात स्वतःचा जिवनप्रवास क्रिकेट पटू कपिल देव उलगडणार आहे. फिक्की महिला विंग (FLO) आयोजित महिलांना उद्योग व्यवसायात प्रोत्साहन देण्यासाठी उदया एका परिषदेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमास कपिल देव प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
फिक्की पुणे हि उदयोजकांची शिखर संस्था आहे. या संस्थेची (FLO) महिला विंग ही एक आघाडी आहे. नुकतेच ७ एप्रिल रोजी महिला विंग (FLO) पुणेच्या अध्यक्षपदी प्रसिध्द उद्योजीका निलम सेवलेकर यांची निवड करण्यात आली आहे. त्या निमित्त सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. निलम सेवलेकर या उद्योजक व्यवसाय बरोबरच,सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनिय कार्य आहे. त्या पुण्याचे लोकप्रिय महापौर बाबूराव सणस यांची नात असून बाळासाहेब सणस यांच्या कन्या आहेत. सेवलेकर यांनी येत्या वर्षभरात पुण्यातील फिक्कीच्या महिला उद्योजकांची संख्या मोठयाप्रमाणात वाढविण्याचासंकल्प केला आहे. महिला उद्योजीका घडवण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम उद्योग मार्गदर्शन शिबीर,परिषदा, व मार्गदर्शन पर कार्यक्रम आयोजित करून महिला उद्योजकांना मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य आणि संधी निर्माण करण्यार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
त्याचाच एक भाग म्हणून उदया आंतरराष्ट्रीय किकेटपटटु कपिल देव यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या वेळी 1983 साली भारताने पहिल्यांदा विश्वकप जिंकला होता त्याच्या दुर्मिळ आठवणी ही कपिल देव यावेळी महिलांना सांगणार आहे .या कार्यक्रमाने महीला उद्योजकांना नवी उमेद ,आशा आणि प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा सेवळेकर यांनी यावेळी व्यक्त केली.
या पत्रकार परिषदेस महिला विंग अध्यक्षा (FLO) निलम सेवलेकर, वरिष्ठ उपाध्यक्ष रेखा मगर, उपाध्यक्षा पिंकी राजपाल,खजिनदार सोनिया राव,सहखजिनदार पुनम खोच्चर सचिव अनिता अग्रवाल, सहसचिव सुजाता सबनिस, उषा पुनावाला यांच्या सह पुणे शहरातील फिक्की (FLO) च्या प्रमुख पदाधिकारी व उद्योजिका उपस्थित होत्या.
कपिल देव उलगडणार जीवन प्रवास
Date:

