मुंबई -‘सोनिया सेना बाबराच्या सेनेपेक्षा वाईट असल्याचे म्हणत कंगना रनोटने उद्धव ठाकरे आणि सरकारवर टीका केली आहे. कंगनाने ट्विट केले की, माननीय राज्यपालांनी गुंडा सरकारला प्रश्न विचारला, हे ऐकून छान वाटले. या गुंडा सरकारने बार आणि रेस्टॉरंट्स उघडले पण मुद्दामुन मंदिरे बंद ठेवली. सोनिया सेना ही बाबराच्या सेनेपेक्षा वाईट आहे,’ असे ट्वीट कंगनाने केले.
राज्यातील मंदिर खुली करण्याची मागणी भाजपकडून दिवसेंदिवस जोर धरत असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंदिर खुली करण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं असून काही सवाल उपस्थित केले. लॉकडाउन शिथिल केला जात असताना आणि एकीकडे बार, रेस्टॉरंट खुली करत असताना देवीदेवतांना मात्र अजूनही कुलूपबंद का ठेवलं जात आहे? असा सवाल राज्यपाल कोश्यारी यांनी केला. त्या पत्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारेच राज्यपालांना उत्तर दिलं. करोनाचा धोका लक्षात घेता मंदिरं उघडणं अद्याप शक्य होत नसून यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन त्यांनी याद्वारे दिलं. या पत्रांमुळे ठाकरे सरकार आणि राज्यपाल कोश्यारी यांच्या वाद पुन्हा एकदा स्पष्ट झाले. पण याचदरम्यान, अभिनेत्री कंगना राणौत हिने या वादात उडी घेतली.
राज्यपाल कोश्यारी यांनी पत्रात उद्धव ठाकरे यांना त्यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेची आठवण करून दिली होती. तर हिंदुत्वासाठी मला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असं उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं होतं. यात कंगनानेही एक ट्विट केलं. “हे पाहून आनंद झाला की ‘गुंडा सरकार’ला राज्यपाल प्रश्न विचारत आहेत. राज्यपाल महोदय, गुंडा सरकारने बार आणि रेस्टॉरंट उघडण्याची परवानगी दिली आहे, पण मंदिरं मात्र योजनाबद्ध पद्धतीने बंद करून ठेवली जात आहेत. ही सोनिया सेना तर बाबरसेनेपेक्षाही वाइट वर्तणुक करताना दिसते आहे”, असं ट्विट अभिनेत्री कंगना राणौतने केलं.

