पुणे, ७ जून २०२२: पुणे-स्थित भारतीय उद्योगसमूह कल्याणी ग्रुपची संरक्षण उद्योगक्षेत्रातील कंपनी कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेडने भारत १५० हे मल्टी-पेलोड, व्हेरिएबल मिशन ड्रोन सादर केले असून हे अनोखे ड्रोन या समूहाने भारतात विकसित केले आहे. एक्स-८ कॉन्फिगरेशन ड्रोनची भारतीय सैन्याकडून लेह-लडाखमधील अतिउंचीवरील प्रदेशांमध्ये आधीच चाचणी घेतली जात असून याने २० किलो पेलोडसह ८.५ किमी कामगिरी बजावली आहे.
हे ड्रोन उभ्या लंब स्थितीत टेक-ऑफ व लॅन्डिंग करणारे (व्हीओटीएल) मनुष्यरहित हवाई वाहन (युएएस) आहे ज्याचे कमाल टेक-ऑफ वजन १५० किलो व रिकामे असताना टेक-ऑफ वजन ५८ किलो आहे. या क्राफ्टमध्ये भारतात विकसित करण्यात आलेली रेडिओ कम्युनिकेशन व्यवस्था आणि इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टिम (आयएनएस) आहे ज्यामध्ये अँटी-जॅमिंग आणि अँटी-स्पूफिंग क्षमता आहेत. या क्षमतांनी परिपूर्ण असल्यामुळे हे क्राफ्ट जॅमिंग आणि जीपीएस-नाकारले जाते अशा वातावरणात देखील चालवले जाऊ शकते.
या ड्रोनच्या बॅटरीज ५० किमी ते २०० किमीसाठी कम्युनिकेशन लिंक एन्क्रिप्शन (१२८ एईएस) सह किमान ३० मिनिटे टिकू शकतात. वापर जसा असेल त्यानुसार टिकून राहण्याची शक्ती वाढवली जाऊ शकते.
हे ड्रोन जल व धूळ रोधक भारत १५० -३० अंश सेल्सियस ते ६५ अंश सेल्सियस या तापमान श्रेणीमध्ये, प्रति तास ५० किमीच्या सरासरी वेगासह व वायू झोताला प्रतिकार करण्याच्या १५ एम/एस क्षमतेसह वापरले जाऊ शकते. टेक-ऑफ जमिनीच्या १००० मीटर वर चालवले जाऊ शकते आणि ५५०० एम एएसएलला काम करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे.
याची रचना स्वायत्त (ऑटोनॉमस) आणि इलेक्ट्रॉनिकदृष्ट्या स्थिर असल्यामुळे ते लॉजिस्टिक, शोध आणि बचाव, सिग्नल इंटेलिजन्स आणि कम्युनिकेशन इंटेलिजन्स, आयएसआर, वॉरहेड ड्रॉपिंगसाठी लॉइटरिंग म्युनिशन इत्यादींसाठी वापरण्यास सुयोग्य आहे.
भारत फोर्ज डिफेन्सचे अध्यक्ष व सीईओ श्री. राजिंदर भाटिया म्हणाले, “भारत १५० हे अत्याधुनिक मानवरहित हवाई वाहन विकसित केल्याचा आम्हाला अतिशय अभिमान वाटतो. स्वदेशात अशी यशस्वी कामगिरी बजावल्यामुळे आपल्या देशाला स्वावलंबी बनवण्याची आमची वचनबद्धता अधिक दृढ झाली आहे. हे ड्रोन विविध क्षेत्रांमध्ये विविध कामांसाठी वापरले जाऊ शकते. आम्हाला आशा आहे की हे ड्रोन खूप चांगली कामगिरी बजावेल आणि लवकरच त्याचा अनेक ठिकाणी वापर केला जाऊ लागेल.”
कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड हा प्लॅटफॉर्म पुढे अजून जास्त विकसित करेल, त्याच्या टिकून राहण्याच्या, पेलोड क्षमतांमध्ये आयएसआर क्षमतांमार्फत सुधारणा घडवून आणेल.

