ठाणे- महात्मा गांधींबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या कालीचरण ला आता ठाणे पोलिसांनी कब्जात घेतले आहे . राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या तक्रारीवरून कालीचरण आता ठाण्याच्या पोलिसांच्या कारवाईला सामोरे जात आहे.पुणे पोलिसांनी 19 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात कालीचरण ने प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अटक केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सेनापती अफझलखान याला ठार मारल्याच्या घटनेच्या स्मरणार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरण च्या अडचणी वाढतच जातील असे दिसते आहे नौपाडा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कालीचरण ला बुधवारी रात्री छत्तीसगडची राजधानी रायपूर येथून अटक करण्यात आली, जिथे तो अशाच एका प्रकरणात तुरुंगात होता . कालीचरणला यापूर्वी पुणे पोलिसांनी अटक केली होती. यानंतर त्याला रायपूर येथून ट्रान्झिट रिमांडवर आणण्यात आले. लवकरच ठाणे पोलिस त्याला पोलिस कोठडीसाठी स्थानिक न्यायालयात हजर करणार आहेत.नौपाडा पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कालीचरण यांच्यावर ही कारवाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या तक्रारीच्या आधारे करण्यात आली आहे.गेल्या वर्षी 26 डिसेंबर रोजी छत्तीसगडच्या राजधानीत आयोजित एका कार्यक्रमात कालीचरण ला महात्मा गांधींबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल रायपूर पोलिसांनी अटक केली होती. त्याचवेळी, 12 जानेवारी रोजी वर्धा, महाराष्ट्र पोलिसांनी त्याला अशाच एका प्रकरणात अटक केली होती.
.

