बंधुता चळवळीचा इतिहास ग्रंथरूपाने वाचकांच्या भेटीला

Date:

काषाय प्रकाशनचा उपक्रम; ‘बंधुता आणि संघर्ष’ ग्रंथाचे २३ रोजी डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रकाशन

पुणे : बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चार दशकाहून अधिक काळ चालू असलेल्या बंधुता चळवळीचा इतिहास ग्रंथरूपाने वाचकांच्या भेटीला येणार आहे. काषाय प्रकाशनाच्या पुढाकारातून ‘बंधुता आणि संघर्ष’ ग्रंथाचे येत्या २३ जानेवारी २०२१ रोजी प्रकाशन होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हॉटेल सुकांता, डेक्कन जिमखाना, पुणे येथे हा प्रकाशन सोहळा होणार आहे.
गेल्या चार दशकाहुन अधिक काळ सुरु असलेला बंधुतेचा हा प्रवास डॉ. नयनचंद्र सरस्वते यांनी ‘बंधुता आणि संघर्ष’ या ग्रंथात मांडला आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या संविधानिक मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमाची सविस्तर माहितीही यात आहे. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी विविध संस्थांच्या सहकार्याने घेतलेल्या सात विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाची, बारा विविध महापुरुषांच्या जीवनकार्यावर घेतलेल्या विचारवेध संमेलनांची आणि अखंडितपणे घेतलेल्या २२ राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनांची माहिती त्यामध्ये दिलेली आहे.
काषाय प्रकाशनच्या या उपक्रमासाठी  ‘बंधुता आणि संघर्ष’ या नावे प्रसिद्ध साहित्यिक आणि विचारवंत डॉ. नयनचंद्र सरस्वते यांनी अभ्यासात्मक आणि संशोधनात्मक लेखन केलेले आहे. या ग्रंथाच्या प्रकाशनासोबतच विविध क्षेत्रातील १९ व्यक्तींना आणि सहा संस्थांना पाहुण्यांच्या हस्ते ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्कारा’ने गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रकाशक प्रा. चंद्रकांत वानखेडे यांनी दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...

छत्रपती संभाजीनगर येथे अग्निवीर भरती रॅलीला सुरुवात

२० फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) कॅन्टोन्मेंट...

शासकीय भाषा सुधारण्यासाठी शासनाने समिती नियुक्त करावी : महेश भागवत

अधिकाऱ्यांनो, चांगले काम करा, लिहिते व्हा अन्‌ लोकाभिमुखता जपा!महेश...

एआय इम्पॅक्ट समिट 2026 चा नवी दिल्लीत‌ समारोप

18-19 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या एआय इम्पॅक्ट समिट 2026 चा...