पुणे-
कठुआ, उन्नाव व सुरत येथे झालेल्या महिलांवर अत्याचारा विरोधात शिंदे हायस्कुल चौक ते गजानन महाराज चौक या दरम्यान आक्रोश यात्रा व कॅण्डल मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यामध्ये सहकारनगर, पद्मावती व लक्ष्मीनगर परिसरातील अनेक संस्था आणि संघटना सहभागी झाल्या होत्या.
या प्रसंगी मोर्च्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, युवती व युवकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. महात्मा गांधी तरुण मंडळ, मैत्रीय महिला मंच, शिव ओम क्रिडा प्रतिष्ठान, काचेचा गणपती मित्रमंडळ, एकत्व फाऊंडेशन, स्ट्रायकर्स क्लब, पुणे हेल्पिंग हॅन्डस, सायन्स अॅकॅडमी व दिलासा आधार केंद्र आदी संघटना सहभागी झाल्या होत्या. बलात्कारांच्या घटनेतील आरोपींना फाशी झालीच पाहिजे यासारखे हातात फलक घेतलेल्या युवतींचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. या प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाले पाहिजे, पुन्हा असा गुन्हा करण्याचं धाडस कोणी केलं नाही पाहिजे, बलात्कारासारख्या घटनांच्या केसेस फास्ट ट्रक कोर्टात चालविल्या जाव्यात, महिला सुरक्षेकरिता कठोर पाऊले उचलली जावीत, असे मनोगत उपस्थित महिला व युवतींनी केले. या कॅण्डल मार्च व आक्रोश मोर्च्याचे आयोजन श्रीनिवास सुभाष जगताप यांनी केले होते.





