वडिल अपघातात गेले तर आईची मृत्यूशी झुंज

Date:

जुन्नर /आनंद कांबळे :
आई मृत्यूच्या दारात असताना ,वडिलांचा अपघाती मृत्यू झाला.
आदिवाशी भागातील पिंपरवाडी येथील  शालेय विद्यार्थ्यांवर असा बिकट प्रसंग आला.
 याबाबत  दुर्गसंवर्धक रमेश खरमाळे यांनी  सोशल मिडियावर माहिती देताच शिरुर विभागाचे खासदार डाँ.अमोल कोल्हे  यांनी मदतीसाठी हात दिला तर समाजातून मदतीसाठी जनता पुढे आले आहेत असे ही खरमाळे यांनी सांगितले .
  पिंपरवाडीचे पोलिस पाटील विष्णू घोडे यांनी याबाबत या कुटुंबाची माहिती दिली.
साध्या घरात व अंधा-या खोलीत उषा जयवंत डामसे या मृत्यूच्या दारात असलेल्या रमेश खरमाळे यांनी पाहिले.
 माऊलीचे दर्शन मला घडले. डोळ्यांत अश्रूच्या खळखळा वाहत असलेल्या धारा मला दिसल्या.तिच्या डोळ्यात वाहत असलेल्या धारांचा पाझर माझ्या डोळ्यांत उतरायला वेळ लागला नाही. अवघे तीस वर्षे वय असलेल्या या माऊलीचा अकांत पाहवत नव्हता. गळ्याला पाडलेल छिद्र बॅंडेजने बंद केलेले दिसत होते. पायांच्या काड्या झालेल्या दिसत होते. अंग शांत पडलं होतं फक्त डोळ्यांची हालचाल होताना दिसत होती. मोठा मुलगा उशाशी बसून आईचे सांत्वन करत होता. हळुवार त्याचे नाजूक हात आईच्या डोक्यावरून फिरताना दिसत होते.
    मोठा मुलगा राहुल १० वीत तर छोटा रोहन ९ वीत शिकत आहेत. नवरा चाकणमध्ये खाजगी कंपनीत १५ हजार रूपये पगार घेत काम करत होते. जुन्नर तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील आंबे येथील पिंपरवाडीचे जयवंत डामसे आपल्या आई,दोन मुले व बायको सौ. उषा सोबत १५ हजारांत सुखाने संसार करत होते. नियतिचे चक्र अचानकच या सुखी संसार करणा-या कुटुंबावर कोसळले. चाकणमध्ये काही कामानिमित्त ही माऊली पती सोबत गेली असता उभ्या असलेल्या दुचाकीवर बसताच पाठीवर मागे अचानक कोसळते. पाठीचा कणा क्षणात निखळतो. मज्जातंतू तुटल्यामुळे तीन आॅपरेशन होतात. रवानगी तीन विविध हाॅस्पिटलला होते. पत्नीसाठी होती नव्हती तेवढी रक्कम व कर्ज घेत ६/७ लाख रुपये  जयवंत डामसे खर्च करतात. १० वी शिकत असलेल्या राहुलला आईच्या देखभालीसाठी शाळा सोडावी लागते. गेली आठ महिने पती विविध नातेवाईकांकडून उसने पैसे घेत बायको उषा वर इलाज करतात. परंतु शेवटी अपयशच  पदरात पडते. २ फेब्रुवारी २०२० ला ते गावी बायकोला भेटायला निघतात. वेळ संध्याकाळची असते. ते घरी पोहचण्या आधीच फोन येतो की तुमचा माणूस रस्त्यावर पडला आहे. नाका तोंडातून रक्त बाहेर येत आहे. भाऊ प्रविण धावत पळत पिंपरवाडीतुन चाकण ते खेडच्या मध्ये रस्त्यावर भाऊ जयवंत पडलेले ठिकाण गाठतात त्यांना उचलून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करतात. उपचार सुरू केल्यानंतर डामसे दुसऱ्या दिवशी सकाळी ११ च्या सुमारास दि. २/२/२०२० रोजी सगळ्यांना सोडू या जगाचा कायमचाच निरोप घेतात. दोन छोटी मुलं पोरकी होतात तर मृत्युशी झुंजणारी पोरांची आई विधवा होते. म्हाता-या आईचे तर विचारूच नका. जगातलं सगळ्यात मोठे दुःख तीला या वयात सोसावं लागलं. मुलगा सांगत डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रुंनी सांगत होता बाबांची दशक्रिया करायचीय परंतु विकत घ्यायला काहीच उरलं नाही. आईचा डॉक्टर रोज चालू आहे पण पैसा नाही. मामांनी बहीणींच व मामींच मंगळसूत्रे गहाण ठेवून व इतरांकडून उसणवार पैसे आईवर इलाज केलेत परंतु त्यांचीच परीस्थिती एवढी वाईट आहे की काय बोलू मी. मी डबडबलेल्या डोळ्यांनी बाहेर आलो. इतर सोबत जमलेले सगळे बाहेर आले. जगेन मायभू तुझ्यासाठी हे माझी पुस्तके विकलेली रक्कम दोन हजार खिशात होती ती मी राहुलच्या हातात टेकवली, बाबांच्या दशक्रियेला खर्च करण्यासाठी ठेव म्हटले. वयाने या छोट्या मुलाला कोण घेणार कामावर ? बाल वय अजुन. कर्ज कसे फेडणार? आईच्या इलाजाकरीता कोठुन आणणार पैसा? म्हातारी आजी व ९ वी शिकत असलेल्या भाऊ यांचा कसा सांभाळ करणार? सगळे प्रश्न अनुत्तरित होते. गावकरी व गावातील बचतगट मिळून दशक्रिया विधी पुर्ण करतील परंतु पुढे काय? या विचारानेच अंगावर शहारे येत होते. देव दयाळू आहे की नाही माहीत नाही, परंतु देवासारख्या माणसांनी जर या परीवाराला आधार म्हणून ५०/१०० रु. मुलांच्या आईच्या बॅंक खात्यात एक छोटीशी मदत म्हणून जर जमा केली तर, चार जिवांना जिवदान देण्यासाठी मदत केली तर नक्कीच या कुटुंबासाठी आपण देवदूत ठराल अशी आशा बाळगतो.  पोस्ट शेअर करा नक्कीच म्हणणार नाही कारण माणुसकी अजुनही जिवंत आहे. सह्याद्रीचे सौंदर्य ग्रुप परीवार सदस्यांना विनंती आहे की आपली सदस्य संख्या पंच्याहत्तर हजार आहे. फक्त प्रत्येकी शंभर रुपये योगदान दिले तर आपल्या परीवारातील मदतीमुळे या सह्याद्रीच्या लेकीच्या कुटुंबाला मदतीचा हात मिळेल.
      नाव – उषा जयवंत डामसे
मु. पिपरवाडी पोस्ट आंबे ता.जुन्नर जि. पुणे पिन ४१०५०२
खाता क्रमांक – 1579108015343
                       कॅनरा बॅंक आपटाळे
    IFSC CODE – CNRB0000274
    MICR CODE – 410015153
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नगरपरिषद, नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता संपूर्ण यंत्रणा सज्ज- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

मतदारांना मतदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन पुणे, दि. १९: राज्य निवडणूक...

पेशवे पार्कमधील कोट्यवधींच्या शिवसृष्टीची दुरावस्था:भाजप व प्रशासन जबाबदार- शिवसेनेची निदर्शने

पुणे—पेशवे पार्कमधील कोट्यवधींची शिवसृष्टी धुळखात पडून ठेवण्यात आली आणि...

शरद पवार गटाच्या २५२ इच्छुकांच्या मुलाखती संपन्न

पुणे-आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार...

आता महात्मा गांधींचे नाव देखील हटविण्याचे कारस्थान -कॉंग्रेसचे आंदोलन

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) या...