![श्री क्षेत्र लेण्याद्री येथे गणेश भक्तांकडून पुरातत्व विभाग करत असलेल्या शुल्क वसुलीला विरोध](https://mymarathi.net/wp-content/uploads/2019/12/IMG-20191225-WA0012.jpg)
श्री क्षेत्र लेण्याद्री येथे गणेश भक्तांकडून पुरातत्व विभाग करत असलेल्या शुल्क वसुलीला विरोध
जुन्नर /आनंद कांबळे
अष्टविनायक पैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री येथे येणाऱ्या गणेश भक्तांकडून पुरातत्व विभागामार्फात प्रती व्यक्ती २५ रुपये शुल्क आकारले जात आहे ह्या शुल्क आकारणीच्या विरोधात लेण्याद्री कडे जाणाऱ्या रस्त्यावर पुन्हा आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
३ ते ६ एप्रिल २०१९ या कालावधीत गोळेगाव ग्रामस्थ, मराठा सेवा संघ जुन्नर, आदिवासी ठाकर समाज व लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने लेण्याद्री शुल्का विरोधात आमरण उपोषण केले होते. त्याची दखल घेऊन पुरातत्व विभागाच्या वतीने गणेश भक्तांसाठी लेण्याद्री दर्शन मोफत व लेणी पाहण्यासाठी मात्र वेगळा रस्ता व तिकीट यासाठी सहमती दिली होती. यासाठी सहा महिन्यात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे सूचित करण्यात आले होते मात्र सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून देखील पुरत्वविभागाच्या कोणतीच पावले उचलली नसल्याने व देशाच्या कानाकोपर्यातून लेण्याद्री दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला व सहली निमित्त येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत लेण्याद्री दर्शनाचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी पुन्हा दि 25 डिसेंबर पासून सकाळी आठ वाजल्यापासून संपूर्ण स्वराज्य निर्माण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हर्षल विजय जाधव, मारुती किसन पारधी, सोमा ठका आधान आदी उपोषणास बसले आहेत.
पुरातत्व विभागाकडून गेली कित्तेक वर्ष लेण्याद्री गिरिजात्मकाच्या दर्शनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांकडून शुल्क आकारले जात आहे. सुरुवातीला दोन रुपये, पाच रुपये ,पंधरा रुपये आणि सध्या पंचवीस रुपये प्रती व्यक्ती शुल्क आकारले जात आहे. वास्तविक हे शुल्क डोंगरात असलेली लेणी पाहणा-र्यांकडून आकारले पाहिजे परंतु तसे न व्होता सर्रास सर्वांकडून शुल्क आकारले जात आहे त्यामुळे लेण्याद्रीला गिरिजात्मकाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना व सहली निमित्त येणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक पैसे मोजावे लागत असून आर्थिक बुदंड सहन करावा लागत आहे.
उपोषण कर्त्यांच्या प्रमुख मागण्या :- १. लेण्याद्री येथे देवदर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला मोफत दर्शन, लेणी पाहण्यासाठी पर्यटकांकडून शुल्क आकारणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी
२. लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट व आदिवासी ठाकर समाजाच्या जमिनीतील अतिक्रमणे तात्काळ काढण्यात यावी
३. पुरातत्व विभागाने त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या हद्दी खुणा पुनर्गठीत करण्यात
सोबत फोटो :-श्री क्षेत्र लेण्याद्री येथील शुल्क आकारणी विरोधात उपोषणास बसलेलेल स्थानिक नागरिक