जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर विधानसभा मतदार संघात तिरंगी लढतीत राष्ट्रवादी पक्षाचे अतुल वल्लभशेठ बेनके यांचा विजय झाला. त्यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांचा ९ हजार ६८ मतांनी पराभव केला.
जुन्नरच्या राजकारणात काळे बेनके शेरकर हा फँक्टर पुन्हा यशस्वी झाला.
राष्ट्रवादीचे अतुल बेनके यांना ७४हजार ९५८ मते तर शिवसेनेचे शरद सोनवणे यांना ६५हजार ८९० ,अपक्ष आशाताई बुचके ५०हजार ४१ मते मिळाली . या तिरंगी लढतीत ९ हजार मतांनी बेनके यांनी विजय मिळविला. बाजार समितीचे सभापती अँड .संजय काळे ,विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी एकदिलाने कम करुन शरद पवार यांना दिलेला शब्द पूर्ण केला .लोकसभेलाही काळे ,बेनके ,शेरकर एकत्र होते .त्यामुळे डाँ .अमोल कोल्हे यांना ४२ हजाराचे मताधिक्य मिळाले होते .
पहिल्या फेरीपासूनच बेनके यांनी मताधिक्य घेतले होते ते शेवटच्या फेरीपर्यत ठेवले.
जुन्नर तालुक्यातील पाणी प्रश्न,शेतकरी यांच्या अडीअडचणी याबाबत बेनके यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनास जनतेने पाठिंबा दिला होता.
मार्क्सवादी पक्ष व मनसेने बेनके यांना पाठिंबा दिला होता तर शिवसेनेत लोकसभेत पराभव झाल्याचे निमित्त पुढे करुन आशाताई बुचके यांची हकालपट्टी केली होती.
आशाताई बुचके यांनी मला आमदार व्हायचेच म्हणून रणांगणात उतरल्या होत्या. त्यांचा यावेळी तिसऱ्यांदा पराभव झाला.
शिवसेनेचे आमदार शरद सोनवणे यांनी विकासकामे केल्याचा दावा करुन निवडणूक लढविली होती.परंतु पाणी प्रश्न योग्य नियोजन न केल्याचा त्यांना फटका बसला. पुन्हा त्यांचे आमदार होण्याचे स्वप्नभंग झाले.
काळे ,बेनके ,शेरकर हे एक आले तर तालुक्यात विजय निश्चितच होते हे पुन्हा सिद्ध झाले.
विजयानंतर अतुल बेनके म्हणाले की ,हा विजय काळे ,बेनके ,शेरकर यांच्या एकजूटीचा व खासदार डाँ.अमोल कोल्हे यांच्या वआघाडीच्या परिश्रमाला आहे.