मंचर : आंबेगाव तालुक्यात शिवसेनेचाच उमेदवार निवडून आणायचा असा शिवसैनिकांनी मनात निश्चय केला तर नक्कीच बदल घडल्याशिवाय राहणार नाही. खेड, जुन्नर , आंबेगाव या तिन्ही तालुक्यातील उमेदवार कसा निवडून आणायचा यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे सर्व नियोजन मी करणार आहे. लोकसभा निवडणुकीला शंभर कौरव समोर होते आणि मी एकटा पांडव होतो. परंतु आगामी विधानसभेच्या निवडणुकीत आंबेगावला सर्व शिवसैनिकांच्या ताकतीने उमेदवार निवडून आणणार आहे. याचा मला पूर्ण विश्वास आहे. शिवसैनिक जो उमेदवार सांगतील त्यालाच तिकीट देणार असल्याचे आढळराव पाटील यांनी जाहीर बैठकीमध्ये सांगून आगामी विधानसभेच्या उमेदवाराच्या नावाचा चेंडू शिवसैनिकांच्या गळ्यात टाकला. आंबेगाव
शिरूरच्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीबाबत शिवसैनिकांची महत्वपूर्ण बैठक वडगाव येथे पार पडली. यावेळी आढळराव पाटील बोलत होते. वडगाव (ता. आंबेगाव) आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघातील शिवसेना व सर्व अंगिकृत संघटनांचेपदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वडगाव काशिंबेग फाटा येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाली. यावेळी शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांच्या चर्चा घडून आली. याप्रसंगी जेष्ठ नेत्या सौ.जयश्रीताई पलांडे , युवानेते अक्षय आढळराव पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रविंद्र करंजखेले, आंबेगाव तालुकाप्रमुख अरुण गिरे, शिरूर तालुकाप्रमुख गणेश जामदार , जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर, सुनिल बाणखेले, सचिन बांगर, सुरेश भोर, बाळासाहेब वाघ, पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे, महेश ढमढेरे, दिपक घोलप, महिला आघाडीच्यामालतीताई थोरात, स्नेहलताताई मोरे, कल्पेश आप्पा बाणखेले, माऊली घोडे, दिलीप पवळे, संतोष डोके, अशोक थोरात, अजित चव्हाण, गोविंद काळे यांच्यासह शिवसेना व अंगिकृत संघटनांचे पदाधिकारी तसेच जेष्ठ शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी मनोगत व्यक्त केले. पुढे बोलताना आढळराव पाटील म्हणाले , २००४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला राष्ट्रवादीची दडपशाहीसंपविण्यासाठी जुन्नर , आंबेगाव , खेड ताल्लुक्यातील प्रत्येक शिवसैनिक पेटून उठला होता. ते दिवस आठवून आगामी विधानसभेच्या निवडणुकीला पेटून उठून प्रचार करा. आत्मविश्वासामुळेच लोकसभेला गाफील राहिलो.
शिवसेनेच्या बाहेर पडून दुटप्पीपणा करणाऱ्यांनी दुटप्पी राजकारण थांबवावा. कोणीही उठतो सुटतो बाळासाहेबांचा फोटो लावतो. बाळासाहेबांचे नाव घेऊन भगव्या झेंड्या खाली दुहेरी भूमिका बजावायची . हे धंदे थांबले पाहिजे. हे आंबेगाव तालुक्यातच नाही तर जुन्नर मध्येही तेच चालू आहे. त्यामुळे आपलं कोण हे शिवसैनिकांनी ओळखलं
पाहजे. शिवसैनिकांशी कट्टर शिवसैनिक म्हणून दुटप्पी राजकारण करणारे प्रा. राजाराम बाणखेले व आशाताई बुचके यांचे नाव न घेता शिवसेनेचे उपनेते शिवाजी आढळराव पाटील यांनी टोला लगावून शिवसैनिकांना सावध केले. शिवसेनेकडून आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी अक्षय आढळराव , जयश्री पलांडे , अरुण गिरे , दीपक घोलप , बाळासाहेब वाघ , देविदास दरेकर ,गणेश जामदार, सचिन बांगर यांनी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक सांगितलेले. सादर इच्छुकांच्या नावाची चर्चाच सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांशी करून अंतिम नावाची यादी मातोश्रीकडे पाठविणार असल्याचे आढळराव यांनी सांगितले. या कार्यक्रमाची प्रस्तावना सचिन बांगर यांनी तर आभार बाळासाहेब वाघ यांनी मानले.
आंबेगाव तालुक्यात शिवसेनेचाच उमेदवार निवडून आणणार- आढळराव पाटील
Date: