माझ्या हकालपट्टीला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व आमदार शरद सोनवणे हेच जबाबदार – आशा बुचके

Date:

निष्ठावान शिवसैनिकांच्या बळावर जुन्नर विधानसभा निवडणूक लढविणारच – आशा बुचके
जुन्नर /आनंद कांबळे -निष्ठावान शिवसैनिकांच्या बळावर शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी मी जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणारच अशी घोषणा जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके यांनी नारायणगाव येथे केली.
माझ्या हकालपट्टीला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व आमदार शरद सोनवणे हेच जबाबदार असल्याचा आरोपही बुचके यांनी यावेळी केला.
येथील जयहिंद मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आशा बुचके बोलत होत्या.
शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना पक्षाची उमेदवारी बहाल केली जाते. मात्र पक्ष संघटनेसाठी अहोरात्र वीस वर्षे झिजणाऱ्या महिलेची हकालपट्टी केली जाते. पक्षसंघटना वाढविली, पक्षाकडे उमेदवारी मागितली हा माझा गुन्हा झाला आहे का, असा प्रश्न आशा बुचके यांनी यावेळी केला.
 एकनिष्ठ व कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असणाऱ्या बुचके यांची शिवसेना पक्षातून नुकतीच हकालपट्टी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडताना त्यांना भावना अनावर होत होत्या.
यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब पाटे, उपतालुकाप्रमुख संतोष खैरे, माजी सभापती संगीता वाघ, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजाळे, बाजार समितीच्या संचालिका सुरेखा गांजाळे, महेंद्र सदाकाळ, एकनाथ शेटे, अशोक पाटे, पंडित मेमाणे, पुष्पा आहेर, संगीता खैरे, सरपंच अर्चना औटी, कैलास मनसुख, आशिष माळवदकर, संतोष खंडागळे, डी. के. भुजबळ, ज्योती दुराफे, उमेश चव्हाण, सोपान खैरे आदी पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते बुचके यांना पाठींबा देण्यासाठी उपस्थित होते.
आशाताई बुचके यांच्या हकालपट्टीला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व आमदार शरद सोनवणे हेच जबाबदार असल्याचा आरोप यावेळी बाळासाहेब पाटे, कैलास मनसुख व काही कार्यकर्त्यांनी केला.
 अत्यंत भावूक होऊन बुचके म्हणाल्या, ” मी पक्षविरोधी काम केल्याने पक्ष प्रमुखांनी हकालपट्टी केल्याचे आढळराव पाटील सर्वत्र सांगत आहेत. पक्षविरोधी काम केल्याचा पुरावा द्या,मी पाहिजे ती शिक्षा भोगण्यास तयार आहे, अन्यथा शंकराच्या पिंडीवर हात ठेऊन खरं खोटं करण्यासाठी तयार व्हा. आढळराव पाटील पुरावा देऊ शकले नाहीत. मी पक्षसंघटनेचे मागील वीस वर्षे प्रामाणिकपणे  काम करत असताना पक्षाकडे उमेदवारी मागितली हा माझा गुन्हा आहे काय?
पक्षप्रमुखांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्यामुळे माझ्यावर कारवाई करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटील पराभूत झाले त्यांचे पुनर्वसन केले. मी दोन वेळा पराभूत झाले माझ्या पुनर्वसनासाठी का प्रयत्न केला नाही ?
शिवसेनाप्रमुखांनी अन्याय सहन न करण्याची शिकवण आम्हा शिवसैनिकांना दिली आहे. माझी माय बाप जनताच मला न्याय देईल, यापुढे माझे कार्यकर्तेच माझे राजकीय भवितव्य ठरविणार आहेत. असे बुचके यांनी सांगितले.
आमदार सोनवणे यांना उमेदवारी देण्याची भूमिका असल्याने मातोश्रीवर चुकीची माहिती देऊन बुचके यांचे हकालपट्टी करण्यात आढळराव पाटील यांनी कट रचला, अशी टीका यावेळी बाळासाहेब पाटे, संतोष खैरे यांनी केली.
    गेली साडेचार वर्ष आमदार सोनवणे यांनी शिवसेना विरोधी भूमिका घेतली. त्यांच्या भूमिकेमुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत काही शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला. असे असताना निष्ठावान शिवसैनिकांना डावलून आमदार सोनवणे यांना उमेदवारी बहाल केली जाते. सोनवणे यांच्या ऐवजी तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांना पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी मागणी यावेळी संगिता वाघ, महेंद्र सदाकाळ, उपविभागप्रमुख रूषी डुंबरे यांच्यासह शिवसैनिकांनी केली.
यावेळी बुचके यांच्या कन्या अॕड. ज्योती दुराफे म्हणाल्या की,  गेली विस वर्ष माझ्या आईने घरादारावर तुळशीपत्र ठेवले व जनतेची निस्वार्थ सेवा केली.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहिले वहिले  डिजिटल डेटा संकलन आणि स्व-गणना सुविधेसह जनगणना 2027 चा  राष्ट्रीय स्तरावर प्रारंभ

जगातील सर्वात मोठी जनगणना मोहीम, जनगणना 2027 सुरू झाली आहे. भारत सरकारने...

पुण्यात ड्रग विक्री: 250 ते 300 जणांचे रॅकेट,8 आरोपी निष्पन्न

पुणे- पुण्यात २५० ते ३०० जणांचे एमडी ड्रग...

कार्यकारी अध्यक्षपदावरून प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्षपदावरून सुनील तटकरे पदच्युत ? चर्चेचे वादळ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून प्रफुल्ल पटेल आणि...