जुन्नर / आनंद कांबळे
ओतूर(ता.जुन्नर)येथे दुपारी साडेचारनंतर झालेल्या जोरदार वादळी पावसाने घर पडून दोन चिमुकले ठार झाले.
वैष्णवी विलास भुतांबरे(वय ६),आणि कार्तिक गोरख केदार (वय २) अशी या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.ही घटना ओतूर जवळील तेलदरा या वस्तीत घडली.या दुर्घटनेत या चिमुरड्यांची आजी चिमाबाई केदार (वय ६५) यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर वादळाने घराचे पत्रे उडत असताना भिंती हलायला लागल्याने या चिमुरड्यांचे आजोबा बापू लक्ष्मण केदार घराबाहेर पळाल्याने त्यांचा जीव वाचला.दरम्यान याच वादळामुळे ओतूर बसस्थानकातील
एका दोन मजली इमारती वर उभारण्यात आलेले मोठे होर्डींग सांगाड्यासह रस्त्यावर कोसळले.परंतू पाऊस सुरु असल्याने रस्त्यावर कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली.मात्र होर्डींग पडून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका दुचाकीचा चक्काचूर झाला.
ओतूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश खुने यांनी दिलेल्या माहीतीनुसार दुर्घटनेत सापडलेल्या दोन्ही चिमुकल्यांना घटना घडल्यानंतर ओतूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले,परंतू त्यांचा उपचारापुर्वीच ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.
दोन्ही नातवंडे डोळ्यादेखत गेली.
दरम्यान दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेली दोन्हीही नातवंडे सुटी असल्याने आजोळी आली होती.मात्र त्यांचा डोळ्यादेखत दुर्देवी मृत्यू झाल्याने आजोबा बापू केदार यांच्यासह मुलांच्या आईवडीलांना मोठा धक्का बसला आहे.
ओतूरला एस टी.स्टँडवर एका बिल्डिंगवर लावलेला जाहीरातीचा फलक वादळी वा-यासह झालेल्या पावसाने कोसळला. एक दुचाकीवर हा फलक पडल्याने तीचे नुकसान झाले.तर येथे नेहमी वर्दळ असते मात्र पाऊस सुरु होता यामुळे याठिकाणी कोणीही नसल्याने मोठी जीवीतहानी टळली.
ओतूर ब्राम्हणवाडा रस्त्यावर रोहोकडी ते ओतूर दरम्यान रस्त्यालगतची झाडे कोसळल्याने दोन्हीही बाजुची वाहतुक विस्कळीत झाली होती.तसेच बाबीतमळा (ओतूर)येथे एका घराचे पत्रे उडुन विद्युत डी.पी.वर पडल्याने वीजप्रवाह खंडीत झाला होता.