जुन्नर /आनंद कांबळे
माणिकडोह (ता.जुन्नर )येथील शहाजी सागर जलाशयातून पाणी सोडण्यास विरोध करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांचेसह 87 जणांना जुन्नर पोलिसांनी धरणाच्या गेटवरच ताब्यात घेतले नंतर त्यांना सोडून देण्यात आले.
माणिकडोह धरणातून पाणी सोडण्यास कुकडी नदीकाठच्या बावीस गावातील स्थानिक शेतकऱ्यांचा कडाडून विरोध असल्याने आज येथील पाणीप्रश्न चिघळला आहे. यावर्षी माणिकडोह 72 टक्के भरले सद्या दहा टक्केच पानी शिल्लक आहे व अजून उन्हाळ्याचे तीन महिने जायचे आहेत. पहिल्या जम्बो आवर्तनात जवळपास 52 टक्के पाणी सोडल्यात आले असून आता पाणी सोडले तर ऐन उन्हाळ्यात पिके जळून जातील तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. शेतक-यांना पुढील ३ महिने पिण्याचे पाण्याच्या बराेबरच चा-याच्या पाण्याच्या सुद्धा नियाेजन करावे लागणार आहे. शेतीमालाला बाजारभाव नाही त्यातच हाताताेंडाशी आलेल्या पिकांना पाणी नसल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. कुकडी पाटबंधारे विभागाने यापुढील काळात जुन्नर शहर व लगतच्या २२ गावांच्या शेतक-यांचा विचार करून पाणी राखीव ठेवावे.
प्रशासनाने ता 31 रोजी पहाटे 3 वाजता कडक पोलीस बंदोबस्तात 1300 क्यूसेक्स ने नदीपात्रात पाणी सोडले आहे.
दरम्यान काल ता.३० राेजी श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांना माणिकडाेहचे साेडण्यात येणारे पाणी अडविण्यास विरोध करू नये, आंदाेलनाचा पवित्रा घेऊ नये म्हणून पोलिसांनी नाेटीस दिली हाेती. शेरकर यांना यासंदर्भात नोटीस आल्याने शिरोली बुद्रुक येथे सकाळी 10 वाजता सोसायटीच्या परिसरात शेकडो कार्यकर्त्यांचा जमाव जमला होता. परंतू आपल्या तालुक्यात पाण्याचा गंभीर प्रश्न असताना पुढील तीन महिने शेतक-यांना अडचणीचा सामना करावा लागणार असल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहीजे या भूमिकेतुन आंदोलन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विघ्नहरचे व्हाईस चेअरमन अशाेक घाेलप, मा. नगराध्यक्ष दिनेश दुबे, विघ्नहरचे संचालक देवेंद्र खिलारी, सचिन टाव्हरे, धनेश पडवळ, वैभव काेरडे, प्रदिप थाेरवे, जयवंत डाेके, जितेंद्र बिडवई, नितीन दांगट, अंकुश खंडागळे, सचिन हाडवळे, संताेष साेमाेशी, लक्ष्मण शेरकर, सचिन विधाटे, संदिप शिंदे, सुभाष डाेके, व हजाराे शेतकरी बांधव उपस्थित हाेते..

