स्वच्छ सर्वेक्षण-२०१९ व स्वच्छ शहर तारांकित मानांकन मध्ये जुन्नर नगरपरिषदेचे यश
जुन्नर /आनंद कांबळे
केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालय,भारत सरकार यांच्या द्वारे आयोजित स्वच्छ सर्वेक्षण-२०१९ मध्ये भारतातील 4237 शहरांमधून जुन्नर नगरपरिषदेने घवघवीत यश संपादन केले आहे.
दिनांक ६ मार्च २०१९ रोजी विज्ञान भवन,नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात माननीय राष्ट्रपती महामहीम रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नगरपरिषदेचा गौरव केला जाणार आहे.
या कार्यक्रमास जुन्नर शहराचे नगराध्यक्ष .शाम पांडे , मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर बोराडे उपस्थित राहणार आहेत.
पश्चिम विभागातून क वर्ग नगरपरिषदांमध्ये जुन्नर नगरपरिषदेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून महाराष्ट्र शासनातर्फे सुद्धा जुन्नर नगरपरिषदेला गौरवण्यात येणार आहे अशी माहिती मुख्याधिकारी डॉ.जयश्री काटकर बोराडे यांनी दिली.
नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल नगराध्यक्ष शाम पांडे यांनी सर्व जुन्नर वासीयांचे आभार मानले.
जुन्नर शहराला अव्वल आणण्यासाठी सर्व नगरसेवक ,पदाधिकारी ,आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत खत्री, बांधकाम विभाग प्रमुख विवेक देशमुख ,नगरपरिषदेचा सर्व स्टाफ, मुकादम व सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामामुळेच हे यश आल्याचे नगराध्यक्ष शाम पांडे यांनी सांगितले.