महाराष्ट्रातील आद्य लेणीं पैकी एक जुन्नर येथील तुळजा बुद्ध लेणी.

Date:

जुन्नर /आनंद कांबळे
सम्राट अशोकांनी बुद्धांच्या पवित्र अस्थिधातुंवर ८४००० स्तुप बांधले, लेणी कोरल्या,पहिली लेणी बिहार येथील बराबर येथे कोरली.जगप्रसिद्ध सांची, सारनाथ, भरहूत येथील स्तुप आपल्याला माहीत आहेत. सांची येथील बुद्ध स्तुपाचे चित्र आज नवीन आलेल्या २०० च्या नोटेवर आपणास पहायला मिळते.
जुन्नर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेले शहर.ज्या शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या शिवनेरी किल्याच्या पश्चिम बाजुला कड़ेलोटाच्या पायथ्याजवळ एक टेकडी लागते.त्या टेकडीपासून जवळच ठाकरवाडी म्हणून एक गाव आहे, त्या गावाच्या शेवटी तुळजा लेणी कोरलेली आपणास पहायला मिळते.
भारतातील एकून लेण्यांपैंकी सर्वांत जास्त लेणी जुन्नर तालुक्यात आहेत. त्यापैंकीच तुळजा लेणी.तुळजा लेणीचे वैशिष्ट्य म्हणजे ही लेणी महाराष्ट्रात कोरण्यात आलेली सर्वात पहिली लेणी असावी,असे बौद्ध लेणी अभ्यासक व पत्रकार सिध्दार्थ कसबे यांनी सांगितले .
ही लेणी सम्राट अशोकांच्या काळातच कोरली गेली असे इतिहास अभ्यासकांचे मत आहे.
या लेणीमध्ये असलेला स्तुप हा अन्य ठिकाणी पाहायला मिळत नाही. या स्तुपाच्या भोवती बारा अष्टकोणी खांब आहेत आणि वरती गोलाकार घुमट… बाजुलाच बौद्ध भिक्षुंसाठी विहार, भोजनालय, सभा मंडप कोरले आहेत. काही ठिकाणी सुंदर असे नक्षीकाम केलेले पहायला मिळते. यात उपासक स्तुपाची पूजा करताना दाखवले आहेत. बुद्ध, धम्म, संघ या तीन रत्नांचे त्रिरत्न चिन्ह सुद्धा जुन्नर येथील प्रत्येक लेणीमध्ये कोरलेले दिसते. डोंगरावरुन कोसळणारे धबधब्याचे पाणी थेट लेणीसमोरच पानकोदीमध्ये साठवले जाते. पावसाळ्यात लेणीचे सौंदर्य अधिकच खुलून येते. लेणीमधून समोर असणारा विस्तीर्ण जुन्नर तालुका, शिवनेरी किल्ला दिसतो.
लेण्यांमधील चित्र
या लेणीच्या अभ्यासासाठी अनेक अभ्यासक येत असतात. लेणी आणि शिल्प कलेचे अभ्यासक महेंद्र शेगावकर सर या लेणीबद्दल सांगतात की, या लेणीच्या निर्मितीचा काळ हा सुरुवातीचा म्हणजे इ.स.पू २३० चा आहे. नंतर तिथे अजिंठ्यासारखे चित्रकलेच्या माध्यमातून जातक कथा व बुध्द चरित्रातील प्रसंग साकारण्यात आली.
या लेणीची प्रसिद्धी हेन्री कुझेनच्या कानावर गेली. मुंबई गव्हर्नर व तो या लेणी पाहण्यासाठी येणार होते असा निरोप जून्नरच्या कलेक्टर ला मिळाला. गव्हर्नर येतात म्हणून लेणीची साफसफाई करुन घेण्यात आली. वाढलेली झुडपे, कोळी किष्टके, पाकोळ्याची घाण काढण्यात आली. ही घटना १९१८ मधील आहे. पाणी टाकून गोणपाट – कांबळीच्या मदतीने लेणीच्या भिंती स्वच्छ करण्यात आल्या. त्यामुळे सर्व चित्रे नष्ट झाली. जेव्हा गव्हर्नर, हेन्री कुझेन आले… बघतात तर काय? तो हा प्रकार… जे पाहण्यासाठी आले तेच नष्ट झालेले होते. अतिउत्साह व अज्ञानापायी ऐतिहासिक ठेवा नष्ट झाला होता.
झालेल्या प्रकारामुळे त्यांनी कपाळावर हात मारुन घेतला. याबाबतचा तेव्हाचा अहवाल आजही पुरातत्व खात्याकडे आहे. अज्ञानापायी असे प्रकार अनेक ठिकाणी झालेले आहेत. सोळाव्या – सतराव्या शतकात सारनाथ येथील तथागतांच्या अस्थीचा सोन्याचा करंडक सापडला. त्यातील रक्षा गंगेत श्रद्धापूर्वक विसर्जित करण्यात आली व तो करंडक जपून ठेवण्यात आला. तुळजा लेणी स्तुप व त्यावर असलेले गोल छत्र व बारा गोलाकार स्तंभ अशी रचना अन्यत्र कुठेही आढळून येत नाही.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...