हटकेश्वर ज्ञानमंदिर शाळेचा शताब्दी महोत्सव उत्साहात साजरा

Date:

जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर तालुक्यातील हटकेश्वर ज्ञानमंदिर(जि.प.प्राथ.शाळा गोद्रे)शाळेचा शताब्दी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
प्राथमिक शाळा गोद्रे च्या शताब्दी महोत्सव समारंभाची सुरूवात शनिवार दि.9 रोजी प्रभातफेरीने करण्यात आली मुख्यप्रवेशद्वारापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी शतकपूर्ती शाळेचा नामफलक तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्ररथ तयार करण्यात आला होता प्राथ.शाळेचे विद्यार्थी, ज्ञानदा माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मिरवणूक शाळेच्या प्रांगणात येताच शानदारपणे कार्यक्रमाचे उद्घाटन ललिताताई चव्हाण(सभापती, पं.स.जुन्नर) .देवरामशेठ लांडे (जि.प.सदस्य) मा.दिलीपशेठ गांजाळे(गटनेते,) ,.काळूशेठ गागरे(सदस्य, पं.स.जुन्नर),
अशोकदादाघोलप(व्हाईस चेअरमन, विघ्नहर कारखाना, जुन्नर),भाऊसाहेब देवाडे(प्रवक्ते-जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
 देवरामशेठ लांडे यांनी भविष्यात शाळेस येणा-या अडीअडचणी सोडविण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले.
पंचायत समिती सभापती ललिताताई चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना “ही शाळा एक आदर्श शाळा व्हावी व त्या शाळेचा आदर्श तालुक्यातील  इतर शाळांनी घ्यावा” असे सांगितले.
दुपारच्या सत्रात-रानकवी-कवीवर्य तुकाराम धांडे (मराठी वाड्:मय पुरस्कार प्राप्त)यांच्या काव्यगायनाचे सादरीकरण झाले या कार्यक्रमात या शाळेतील माजी विद्यार्थींनी सौ.जयश्री बांबळे यांनी ही आपल्या कवितांचे सादरीकरण केले.
माजी विद्यार्थी स्नेहसमारंभाचे उद्घाटन  किसनराव भोजणे (प्रशासन अधिकारी म.न.पा.पुणे)यांचे हस्ते करण्यात आले
याप्रसंगी सतिश रेंगडे, जयश्री बांबळे विठ्ठल रेंगडे बुधाजी मांडवे आदींनी सहभाग घेवून शालेय जीवनातील अनेक प्रसंग, आठवणी सांगितल्या.गावातील समस्याबाबतही चर्चा झाली.
सायंकाळच्या.सत्रात महिलासाठी पारंपरिक गीतगायनाचे आयोजन करण्यात आले होते
रात्री गावातील भजनी मंडळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या.त्यामध्ये ७ भजनीमंडळांनी  सहभाग घेतला होता.
रविवार दि.10/2/2019* रोजी सकाळच्या सत्रात आदिवासी संस्कृतची जोपसना करणारे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त व कांबडानृत्याचे मार्गदर्शक *निसर्गवासी ठका बाबा गांगडत्याचप्रमाणे दिवंगत
माजी विद्यार्थी, या शाळेत काम केलेले दिवंगत शिक्षक साहित्यिक विचारवंत यांना आदरांजली वाहण्यात आली.
सकाळी *रांगोळी* *स्पर्धा* आयोजित करण्यात आली होती.यामध्येही महिलांचा उस्फूर्त सहभाग होता रांगोळी मधून *बेटी* *बचाओ,पर्यावरण* *रक्षण* *,शताब्दी* *महोत्सव,पाण्याचा* *वापर,झाडे* *लावा झाडे* *जगवा,आरोग्य* विषयक संदेश देण्यात आले होते.
शिवव्याखाते राहूल शिंदे   यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनावरील शिवव्याखान झाले.अनेक प्रसंग शब्दबद्ध करून मांडले प्रेक्षक त्यांच्या प्रभावी मांडणीने भारावून गेले.
दुपारच्या सत्रात या शाळेत ज्यांनी ज्ञानदानाचे पवित्र काम केले त्या सर्व गुरुजनांचा *”गुरूपूजन”* सोहळा संपन्न  करण्यात आला.गुरूवर्याना पाहुण्यांचे हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.
सांगतासमारंभप्रसंगी आमदार वैभव पिचड ,आमदार पांडुरंग बरोरा.अतुलशेठ बेनके यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्तविक माजी विद्यार्थी व अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी केले
या कार्यक्रमाचे औचित्य साधून आदिवासींचे दैवत वंदनीय *मधुकरराव* *पिचड*  यांना *”आदिवासी* *भुषण* *पुरस्कार”* व सन्मानपत्र” देवून गौरविण्यात आले.त्याचा स्विकार आमदार वैभव पिचड.यांनी केला.
.आमदार पांडुरंग बरोरा यांनी 100 वर्षातील झालेल्या शाळा बदलाचा आढावा घेवून गुरूजनांप्रती आदरभाव व्यक्त करून या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
युवानेते अतुलशेठ बेनके यांनी संयोजन समितीला धन्यवाद देत शाळा विकसित करण्यासाठी आतापर्यंतच्या गुरूजनांचा सिंहाचा वाटा असल्याचे नमूद केले स्वातंत्र पुर्वकालखंडातील ही शाळा. की जिचे नाव हटकेश्वर ज्ञानमंदिर असे ठेवण्यात आले होते.अनेक विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेवून उच्च पदावर काम करत आहेत हे केवळ या शाळेमुळेच.
सांगता समारंभाच्या समारोपप्रसंगी मनोगत व्यक्त करताना .
आमदार वैभव पिचड म्हणाले की, *शतकपूर्ती* *समारंभास* *उपस्थिती* *हा* *एक* *चांगला* *योग* *लाभला*. शाळेतील पहिला विद्यार्थी व त्यावेळीची परिस्थिती पाहाता अतिशय खडतर परिस्थितीत मुलांना शिक्षण घ्यावे लागत असे. असे असतानाही या 100 वर्षात या शाळेत 2500 चे आसपास विद्यार्थी या शाळेने घडविले ही बाबही तितकीच महत्त्वाची आहे. शिक्षण, आरोग्य पाणी या मुलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करावेत सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी संभाजी साळवे,.दादाभाऊ बगाड यांनीही आपली मनोगते व्यक्त केली .
याप्रसंगी ,तुळशीराम भोईर संचालक जिल्हा बँक ,सुभाष मोरमारे माजी सभापती, समाजकल्याण .जयंतकुमार रघतवान,गोविंदराव साबळे,काळु शेळकंदे ,रविंद्र तळपे . पोपट राक्षे..मारूतीशेठ वायाळ, देवरामशेठ मुंढे ,शेख  (पालकमंत्री पुणे यांचे OHD) मा नंदकुमार तांबोळी उपस्थितीत होते आभार मुख्याध्यापक भौरले सर यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माजी विद्यार्थी .आ.का.मांडवे यांनी केले.
शताब्दी महोत्सव यशस्वी साजरा करण्यासाठी महोत्सव समितीचे अध्यक्ष मधुकर रेंगडे, सरपंच विनोद रेंगडे, भिमाजी उतळे,किसनराव भोजणे,सुधाकर उतळे,किसनराव मांडवे,अनंता रेंगडे, दिलीप गायकवाड ,महिला मंडळ,बचतगट,ग्रामस्थ ,पोलिस मित्र मंडळ यांनी परिश्रम घेतले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजयभाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे...

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...