जुन्नर -(संजोक काळदंते)
मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतिने मदर तेरेसा हॉल येरवडा पुणे या ठिकाणी “मानवी हक्क संरक्षण कायदा व भारतीय संविधान” या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले होते यावेळी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष विकासजी कुचेकर म्हणाले कि कायदा होऊनही अनेक ठिकाणी मानवी हक्काचे उल्लंघन होताना दिसत आहे तर सामाजिक परिस्थिती सुधारण्याची गरज आहे या चर्चासत्रात ॲड. रुपाली वाईकर व ॲड.आरबिट्रेटर सतिश एरम मा.नगरसेवक जॉन पॉल ,मा. नगरसेवक हनिफ शेख , संस्थेचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आण्णा जोगदंड, गिताजंली रीठे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
पत्रकार संजोग काळदंते यांनी यावेळी मार्गदर्शनपर सांगितले कि अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधी हेच लोकसेवकांना हाताळतात त्यांच्या कामात लक्ष घालतात यामुळे कधी कधी अपवादात्मक का होईना जनतेवर अन्याय होऊन मानवी हक्काचे उल्लंघन होते.ॲड.सतिश एरम म्हणाले की मानवी हक्क हे संविधानिक असुन लोकसेवकाकडुन याचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झालेल्याची उदाहरण आहेत. यावर महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग प्राप्त झालेल्या तक्रारी नुसार योग्य कारवाई करीत आहे आता ख-या अर्थाने मानवी हक्क व अधिकाराची जनजागृती मोठ्या प्रमाणात होत आहे. तरीही समाजात आजही माणुस म्हणुन जगण्याचा अधिकाराचे उल्लंघन होताना दिसत आहे. यावेळी त्यांनी मानवी हक्क आयोगाची रचना , कार्यपद्धती व कोणत्या तक्रारी आयोगाकडे कराव्यात व कोणत्या तक्रारी करु नयेत याची सविस्तर माहीती दिली . यावेळी ॲड.रुपाली वाईकर यांनी सांगितले की आयोगाने लोकसेवकाला नोटीस बजावली व लोकसेवकाने त्याची दखल घेतली नाही तर कारवाईचे अधिकार आयोगाला दिल्यास मानवी हक्काचे उल्लंघन थांबण्यास बरीच मदत होईल व आयोगाला सुप्रिम कोर्टात जाण्याची वेळ येणार नाही व वेळही वाचेल. या प्रसंगी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर यांनी संस्थेने जनजागृती अभियान हे सामान्य जनतेला मानवी हक्काची जनजागृती व्हावी या उद्देशानेच चालवत असल्याचे सांगितले संस्थेच्या ध्येय व उद्देशाची माहीती देवून उपस्थित लोकप्रतिनिधींना या अभियानाद्वारे सामान्य जनतेला मानवी हक्काची जनजागृती व्हावी म्हणुन कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करुन देण्याचे आव्हान केले व पिडीतांच्या न्याय हक्क व अधिकारासाठी करीत असलेले प्रयत्नांची माहीती दिली.उपस्थित नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे यावेळी चर्चासत्रात सहभागी मान्यवरांनी देवून मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन जावेद शेख , हरी पिल्ले संस्थेचे येरवडा ब्लॉक युनिटने केले होते.
कायदा होऊनही मानवी हक्काचे उल्लंघन होतेय — विकासजी कुचेकर
Date:


