राजकीय अनास्थेने पुणे कोरोनाची शिकार
पुणे- गेल्या वर्षातला चांगला अनुभव गाठीस असताना यावेळी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुणे विभागाची शिकार केल्याचे चित्र दिसत आहे . याची कारणेमिमांसा जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर पहिल्या लाटेचा चांगला सामना करणाऱ्या पुणे विभागाने दुसऱ्या लाटेपुढे शरणागती पत्करल्याचे जाणविल्या शिवाय राहत नाही . आणि या सर्वास कारणीभूत ठरली ती राजकीय अनास्था … राजकीय आधाराशिवाय हतबल बनलेल्या प्रशासनाची गतिमानता … खरे तर यावेळी हि शिकार या शब्दा ऐवजी आत्महत्या हा शब्द वापरावा असा कोणी आग्रह धरू शकले तर तो नाकारता येणे कठीण होणार आहे. आज ३४ हजारहून अधिक कोरोनाबाधित पुणे विभागात आहे वास्तविक पाहता या वर्षी २०२१ मध्ये १ मार्च पासून पुण्यात महापालिकेची कोरोंटाइन सेन्टर्स (विलागीकरण कक्षे ), जम्बो कोविड सेंटर, खाजगी रुग्णालयांवर अंकुश ठेवण्यासारखी सुविधा केंद्रे सुरु झाली असती तर आज ३४ हजाराच्या आकड्यापर्यंत आपण पोहोचू शकलो नसतो .एवढेच नव्हे तर या पुढील वाढत्या रुग्ण संख्याच्या भयावह अवस्थेला तोंड देण्या ऐवजी सुरळीत व्यवस्था निर्माण झाल्याचे चित्र येथे स्पष्ट दिसून आले असते . इथे देण्यात आलेली आकडे वारी सातारा , सांगली ,सोलापूर आणि कोल्हापूर अशा पाच जिल्ह्यातील म्हणजे एकूण पुणे विभागातील असली तरी प्रमख केंद्र पुणेच आहे .शहर आणि महापालिका हद्द यावर बरेचसे अवलंबून आहे. 1 जानेवारी २०२१ ला ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 829 इतकी होती .संपूर्ण जानेवारी महिन्यात कोरोणाचा कडेलोट होत असल्याचे चित्र होते. आणि त्यानंतर 10 फेब्रुवारीला ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 825 पर्यंत खाली आली आणि तिथून पुन्हा वर उसळी मारू लागली .22 फेब्रुवारी ला 9 हजार 242 आणि 25 फेब्रुवारी ला ती 10 हजार 205 वर पोहचली म्हणजेच १० फेब्रु ते २५ फेब्रु दरम्यान १५ दिवसात दुप्पट झालेली संख्या पाहूनही महापालिकेच्या अँँटीचेम्बरचे दरवाजे उघडले गेले नाहीत . ती केवळ लॉबीला रेडकार्पेट अंथरण्यातच धन्यता मानून घेत, जिथे आपली तळी उचलणारी प्रसिद्धी तिथेच काम पद्धतीने या दुप्पट वाढलेल्या कोरोनाला हलके घेत गेली .पर्यायाने २५ फेब्रुवारी नंतर पुण्यात परिस्थिती अवघड झाली . अनेक रुग्णांना सरकारी रूग्णालयात उपचारासाठी धाव घेण्यासाठी नगरसेवक हाच एकमेव घटक उरला . पण १०० मधले ९० नगरसेवकांना नेत्यांनी आपल्यावर लादलेल्या नेतृत्वाच्या आधारावर राहावे लागले .दक्षिण पुण्यातील भाजपची नगरसेविका जे काम करू शकली नाही ती कामे स्वतः आजारी असलेल्या एक समाजकर्मी व्यक्तीने करून दाखविले .१० ते २५ फेब्रुवारी पर्यंत १५ दिवसात दुप्पट झालेली रुग्ण संख्या (१० हजार २०५ ) त्यानंतर २५ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२१ या पुढील २२ दिवसात साडेतीन पट वाढली आणि ३४ हजाराहून पुढे सरकली . आणि तेव्हा सरकारी इस्पितळात जागा मिळणे मुश्कील बनले होते. प्रत्येक घरातल्या तपासण्या होऊ लागल्या .पण तपासण्यांचे रिपोर्ट ३ ते चार दिवसांनी येऊ लागले. रिपोर्ट आल्यावर नागरिकांची आणि संपूर्ण कुटुंबांचीच अवस्था हातघाईला आल्यासारखी दिसत होती. एका वेळी एका घरातील दोघे तिघे बाधित झाल्याने त्यांचा बेड साठी होणारा प्रयत्न हा चटका लावणारा होता .महापालिकेच्या अस्तित्वात असलेल्या यंत्रणेचा घाम निघत होता . पण राजकीय अनास्था अँँटीचेंबर मध्ये पहुडली होती .हा घाम निघूनही २० /२० तास लोकाना हॉस्पिटल समोर बेड साठी तिष्ठावे लागताना पाहावे लागत होते . एकीकडे कोरोनाने केलेला प्रहार आणि दुसरीकडे या अनास्थेने काढून घेतलेले हक्काचे सहाय्य यामुळे असंख्य पुणेकरांचे हाल झाले …. पण जम्बो सेंटर , विलगीकरण कक्षे महापालिकेने सुरु करावीत याबाबत कोणतीही अधिकृत हालचाल दिसत नव्हती .

