मुंबई- संजय राऊत यांना ईडीने समन्स पाठवून बुधवारी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी सांगितले होते. पण संजय राऊत दिल्लीत असल्याने ते काल ईडी कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी बुधवारी वकिलांमार्फत संपर्क साधून चौकशीला उपस्थित राहण्यासाठी ७ ऑगस्टपर्यंत वेळ मागितला होता. पण ईडीने त्यांची मागणी फेटाळत त्यांना नवीन समन्स दिले होते. त्यानुसार आता संजय राऊत यांना २७ जुलैला ईडी कार्यालयात उपस्थित राहायचे आहे.अशा अवस्थेतही खासदार संजय राऊत ठाम आहेत , शिवसेनेची धुरा खांद्यावरच ठेऊन ,ठाकरे कुटुंबाशी निष्ठा राखून लढा देत वादळातील अनिश्चल पर्वतासारखे उभे आहेत त्यांच्या आज सकाळच्या ट्वीट वरून त्यांच्यातला लढवय्या पुन्हा एकदा स्पष्ट होतो आहे.
भीती हेच मनुष्याच्या शोषणाचे कारण असते, हा ओशोंचा सुविचार राऊत यांनी लिहला आहे. त्यापुढे जो डर गया वो मर गया. जय महाराष्ट्र!, असेही संजय राऊत यांनी या ट्वीट मध्ये म्हटले आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा लढण्याचा निर्धार कायम असल्याचे दिसून येत आहे.
तत्पूर्वी काल रात्री संजय राऊत यांनी एक ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी वेळ वाईट असेल तर लोक तुमचा हात पकडण्यापेक्षा ‘चुका’ पकडतात, असे म्हटले होते.

