‘गो ग्रीन-से नो टु प्लास्टिक’ संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन

Date:

पुणे : सुपरमाईंड फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ युवा, नटराज निकेतन, नागपूर व सामवेद इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिकबंदी व प्लास्टिकऐवजी पर्यायी नैसर्गिक घटकांच्या वापरातून ‘गो ग्रीन-से नो टू प्लास्टिक’ संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 5 जानेवारी 2019 रोजी मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कुल येथे सकाळी 9 ते 10 या वेळेत पुण्यातील चित्रकला स्पर्धा होणार आहे.
या राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेमध्ये प्रसिद्ध कार्टूनिस्ट चारुहास पंडित सुपारीच्या पानांपासून बनविलेल्या प्लेटवर पहिले चित्र काढून स्पर्धेची सुरवात करणार आहेत. आमदार मेधा कुलकर्णी, पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशन, सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडके, ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांच्यासह पुण्यातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित असणार आहेत.
या स्पर्धेत चित्र काढण्यासाठी कागदाऐवजी सुपारीच्या पानापासून बनविलेल्या प्लेटचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे ही चित्रकला स्पर्धा जगातील आगळीवेगळी स्पर्धा ठरणार आहे. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांच्यातर्फे या स्पर्धेची विशेष दखल घेण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी येणार्‍या शालेय विद्यार्थी स्पर्धकांना विनामूल्य प्लेट देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेमध्ये माँटेसरी ते ज्येष्ठ नागरिक या गटातील सर्वजण भाग घेऊ शकतात. या स्पर्धेचे वैशिष्ट्ये म्हणजे ’गो ग्रीन-से नो टू प्लास्टिक’ अंतर्गत सुपारीच्या झाडापासून बनविलेल्या प्लेट्सवर ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा भारतामध्ये दिल्ली, मुंबई, पुणे, मध्यप्रदेश, छत्तीसगड यासह देशातील अनेक प्रमुख शहरांच्या ठिकाणी एकाच वेळी घेण्यात येणार असून, सहभागी होणार्‍या प्रत्येकाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासाठी सर्व शाळांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या स्पर्धेसाठी बसवावे व ‘प्लास्टिकचा वापर टाळा व त्या ऐवजी नैसर्गिक घटकांचा वापर करा’ असा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
तसेच वेगवेगळ्या वयोगटांकरिता विभिन्न विषय दिले जाणार आहेत. यात प्रामुख्याने गट ए, बी, सी, डी, इ, एफ अशा सहा गटामध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. कोणतेही फळ किंवा फुल, आवडता ऋतू, निसर्गचित्र/दृश्य, जग वाचवा/पृथ्वी वाचवा, एकता-अनेकता/एकतेचेे बळ, टीम वर्क अशा संकल्पनेवर ही चित्रे असणार आहेत. चित्रकला स्पर्धेचा निकाल त्याच दिवशी जाहीर करण्यात येणार असून, मान्यवरांच्या हस्ते पहिल्या दहा चित्रांना विशेष भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चित्रांचे प्रदर्शनही आयोजिले जाणार आहे.
सहभागी शाळांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्तर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी 9049992809/7 या क्रमांकांवर किंवाwww.supermindfoundation.org या संकेतस्थळावर नावनोंदणी करता येईल, अशी माहिती सुपरमाईंड फाउंडेशन संस्थेच्या मंजुषा वैद्य व सामवेद इंटरनॅशनलचे मुकुंद पात्रीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रोटरी क्लबचे श्रीकांत जोशी व सुपरमाईंड फाउंडेशच्या दया कुलकर्णी उपस्थित होत्या.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतःच्या हातातील घड्याळ गणेश शिंदे यांच्या हाती बांधून केला सन्मान

कोथरूडमध्ये विराट हिंदू संमेलन उत्साहात; गणेश शिंदे यांच्या भाषणाने...

१५ हजार ६६९ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला एकमताने मान्यता,विरोध भाषणात पण लेखी उपसूचना एकाकडूनही नाही

पुणे _महापालिकेतील स्थायी समितीने मुख्य सभेला सादर केलेल्या १५...

घरगुती करदात्यांसाठी शास्ती कर २% वरून १% करावा:नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांची मागणी

पुणे : पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी,...