पुणे : विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व थोर गणितज्ञ डॉ. अच्युत शंकर आपटे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विद्यार्थी सहायक समिती आणि उचित माध्यम पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मासिक व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. या व्याख्यानमालेचे उद्घाटन व त्यातील पहिले व्याख्यान अहमदनगर येथील हिवरेबाजार या आदर्श गावाचे सरपंच पोपटराव पवार यांचे होणार आहे.
शनिवार, दि. २२ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी ६.०० वाजता सेनापती बापट रस्त्यावरील विद्यार्थी सहायक समितीच्या लजपतराय विद्यार्थी भवन येथे हे व्याख्यान होणार असून, ते सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. डॉ. आपटे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यात या व्याख्यानमालेचा समावेश आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींचे दर महिन्याचा चौथ्या शनिवारी हे व्याख्यान होणार आहे, असे विद्यार्थी सहायक समितीतर्फे कळविण्यात आले आहे.

