पुणे : टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर असोसिएशनतर्फे (टीटीए) भारतीय बनावटीच्या ‘लि-आयऑन बॅटरी’वर व्याख्यानाचे आयोजन केले आहे. येत्या रविवारी, ३ जानेवारी २०२१ रोजी सकाळी १० वाजता झूम मिटद्वारे हे व्याख्यान होणार आहे. ‘टीटीए’चे हे ३६ वे व्याख्यान आहे. सुपर कॅपॅसिटरचे उत्पादन करणारी भारतातील एकमेव कंपनी स्पेल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र कुमार शर्मा बोलणार आहेत. यावेळी ‘टीटीए’चे यशवंत घारपुरे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ‘टीटीए’चे सचिव विलास रबडे यांनी दिली आहे.
भारतीय बनावटीच्या ऊर्जा उपकरणांच्या विकासाचा प्रवास डॉ. शर्मा उलगडणार आहेत. लिथियम-आयऑन बॅटरीच्या जगभरातील संशोधनात जवळपास ७० टक्के भारताचे योगदान आहे. असे असतानाही एकही भारतीय उत्पादक या क्षेत्रात नाही. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालय आणि स्पेल टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने सेंटर फॉर मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (सी-मेट) येथे सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन रिचार्जेबल बॅटरी टेक्नॉलॉजी उभारले आहे. सी-मेट लिथियम-आयन बॅटरीचे आणि सोडियम आयन टेक्नॉलॉजीचे प्रवर्तक आहेत. या बॅटरीच्या उत्पादनासाठी लोकांनी पुढाकार घ्यावा, यासाठी काय प्रयत्न होताहेत. ऊर्जा बचतीचे तंत्रज्ञान विकसित करून आत्मनिर्भर भारताकडे टाकलेले हे एक पाऊल आहे. या सगळ्याचा उहापोह डॉ. शर्मा आपल्या भाषणात करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.
भारतीय बनावटीच्या ‘लि-आयऑन बॅटरी’वर’टीटीए’तर्फे डॉ. राजेंद्र शर्मा यांचे रविवारी व्याख्यान
Date:

