Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या ‘द पॅक’ टीमला स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचे एक लाखाचे प्रथम पारितोषिक

Date:

पुणे : दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एआयटी) ‘द पॅक’ टीमने स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचे विजेतेपद पटकावत प्रथम क्रमांकाचे एक लाखाचे पारितोषिक मिळवले आहे. ‘द पॅक’ने ‘ग्रामीण आणि मागास वर्गातील मुलांचे शिक्षण’ यावर ‘यूरेका’ नावाचे सॉफ्टवेअर तयार केले आहे. अंतिम फेरीत २० टीम पोहोचल्या होत्या. त्यात ‘एआयटी’ने हैदराबादच्या एमएलआर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला मात दिली. भारत सरकारच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळ (एआयसीटीई) यांच्या वतीने १ ते ३ ऑगस्ट २०२० या कालावधीत या हॅकेथॉनचे आयोजन केले होते.
या हॅकेथॉनमध्ये सॉफ्टवेअर प्रकारात २५६ खासगी व सरकारी संस्थांमधून अनेक संघ सहभागी झाले होते. साधारणपणे एक लाख विद्यार्थ्यांचा यात सहभाग होता. विविध समस्यांवर उपाय करण्याचे सॉफ्टवेअर बनविण्याचे आव्हान विद्यार्थ्यांपुढे होते. ‘एआयटी’च्या रिशव शर्माच्या नेतृत्वात अक्षय शर्मा, सत्य प्रकाश, हर्ष चौहान, दीपशिखा त्रिपाठी, शुवम कुमार यांच्या ‘द पॅक’ टीमने हे ‘युरेका’ सॉफ्टवेअर बनवले. कोरोनामुळे शिक्षण ऑनलाईन झाले आहे. मात्र, ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव आणि विविध ठिकाणाहून होणाऱ्या व्हिडीओ व्याख्यानाचा मोठा खर्च यामुळे ग्रामीण व आर्थिक मागास विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यावर उपाय म्हणून या विद्यार्थ्यांनी एक अप्लिकेशन तयार केले आहे. कमी इंटरनेट बँडविड्थमध्येही याचा वापर करता येतो. स्वयंचलित ऑनलाईन शिक्षणाच्या दिशेने हे पहिले पाऊल असणार आहे. तसेच ‘युरेका’ अप्लिकेशनमधील सध्याच्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवरील सर्व सुविधा एकत्रितरित्या उपलब्ध असणार आहेत. ‘द पॅक’सह ‘एआयटी’च्या ‘हेक्साडा’, ‘माधवाज’ आणि लोरा एसवायएनसी या आणखी तीन संघानी अंतिम फेरीत स्थान मिळवले.या यशाबद्दल ‘एआयटी’चे संचालक ब्रिगेडियर अभय भट (निवृत्त) यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. भट म्हणाले, “स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचे विजेतेपद आणि एक लाख रुपयाचे प्रथम पारितोषिक मिळवणाऱ्या आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एआयटी) ‘पॅक’ टीमची कामगिरी अभिमानास्पद आहे. केवळ भारतातच नाही, तर जगभरात ही स्मार्ट इंडिया हॅकेथॉन मानाची समजली जाते. विजेतेपदासह ‘एआयटी’च्या चार टीम अंतिम फेरीत गेल्या, हेदेखील आनंददायी आहे. एका टीमला विजेता होण्यापासून थोडक्यात हुलकावणी दिली. गेल्या दोन वर्षांपासून ‘एआयटी’ विविध तांत्रिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करते आहे. २०१९ व २०२० या सलग दोन्ही वर्षी ‘केपीआयटी स्पार्कल’चे विजेतेपद, गेल्या वर्षी आयआयटी दिल्ली येथे झालेल्या ‘एनईसी हेकेथॉन’मध्ये पहिले तीनही क्रमांक ‘एआयटी’ला मिळाले. हे यश विद्यार्थ्यांचे कष्ट, त्यांच्यातील गुणवत्ता दर्शवते. त्याचबरोबर शिक्षकांचे, प्रेरकांचे आणि सिनिअर विद्यार्थ्यांचे मार्गदर्शनही महत्वाचे ठरले हे अधोरेखित होते. विविध प्रकारचे क्लब, अवांतर उपक्रम यातून विद्यार्थी घडताहेत. या अशा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचा आम्हाला अभिमान आहे. त्यापेक्षाही आनंद आहे, तो म्हणजे समाजातील विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी विद्यार्थी प्रयत्न करताहेत. ‘ग्रामीण आणि मागास वर्गातील मुलांचे शिक्षण’ यावर ‘पॅक’ने काम केले आहे.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

देशात दोन लाख नव्या बहुद्देशीय सहकारी सेवा संस्थासहकार क्षेत्राला ११ वर्षांत ४ लाख २१ हजार कोटी

सहकारी सोसायट्यांच्याा संगणकीकरणासह गोदामांच्या उभारणीलाही गती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा २१ डिसेंबर रोजी ‘संकल्प मेळावा’

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह मित्रपक्षाचे नेते...

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा 2027,बोधचिन्ह स्पर्धेत सहभागासाठी आता राहिले फक्त दहा दिवस

जास्तीत जास्त नागरिकांनी 20 डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे प्राधिकरणाचे आवाहन सर्वोत्कृष्ट...