‘आयसीएआय’कडून पोलिसांना ५५० बॉटल्स सॅनिटायझर

Date:

पुणे : कोरोना विषाणूच्या लढाईत आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीसांना दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वतीने ५५० सॅनिटायझरच्या बॉटल्सचे वितरण करण्यात आले. ‘आयसीएआय’च्या वेस्टर्न इंडिया रिजनल कैन्सिलचे (डब्ल्यूआयआरसी) माजी अध्यक्ष सीए सर्वेश जोशी यांच्या पुढाकारातून हे वाटप झाले.
‘आयसीएआय’चे उपाध्यक्ष सीए समीर लड्डा व सीए सर्वेश जोशी यांनी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार व पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्याकडे ३० लिटर सॅनिटायझरच्या बॉटल्स हस्तांतरित केल्या. डॉ. पवार यांनी पोलिसांच्या वतीने सीए इन्स्टिटयूटचे आभार मानले.
सीए समीर लड्डा म्हणाले, “शहरातील लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन व्हावे, याकरिता पोलीस अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांनीही स्वच्छता ठेवणे, सतत हात धुणे आदी गोष्टी गरजेच्या आहेत. कर्तव्यावर असताना तापसणीवेळी अनेकांना त्यांचा स्पर्श होतो. तेव्हा हात स्वच्छ ठेवण्यासाठी सॅनिटायझरचा उपयोग होईल.”
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान केल्याचा प्रकार उघड

पुणे, दि. 4 मार्च: गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे...

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठिंबा: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई, दि. ४ मार्च २०२६.राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत...

श्री रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ९वे वार्षिक रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

पुणे- आर. एम. धारीवाल फाउंडेशन तर्फे समाजसेवेची अखंड परंपरा...

मुळा-मुठा नदी प्रदूषणाविरोधात ‘एमआयटी’च्या विद्यार्थ्यांचा एल्गार

नदीपात्रात अवैध कचरा टाकण्याविरोधात विद्यापीठ प्रवेशद्वारावर आंदोलन; आगी व...