दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय), प्राप्तिकर विभाग (इन्कम टॅक्स डिपार्टमेंट) आणि धर्मादाय आयुक्त पुणे यांच्या वतीने आयोजित मार्गदर्शन सत्रात अनुराधा भाटिया बोलत होत्या. करदात्या धर्मादाय संस्थांना येण्याऱ्या समस्या समजून घेत त्या सोडविण्याच्या हेतून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पुणे आयकर आयुक्त नीरज बन्सल, धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, आयकर आयुक्त (अपील) के. के. मिश्रा, राजीवकुमार, ‘आयसीएआय’चे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे, माजी अध्यक्षा सीए ऋता चितळे, उपाध्यक्ष सीए समीर लढ्ढा, सचिव व खजिनदार काशिनाथ पाठारे आदी उपस्थित होते. सीए शशांक पत्की यांनी या मार्गदर्शन सत्राचे समन्वयन व सूत्रसंचालन केले.
”करदात्यांनी प्रामाणिकपणे कर भरावा. सीएनेही त्याची व्यावसायिक नैतिक मूल्य पाळून काम करावे. धर्मादाय आयुक्तालय डिजिटलाईज होत असून, त्याचा फायदा संस्थांना होईल,” असे दिलीप देशमुख यांनी नमूद केले. के के मिश्रा यांनी अनेकजण समाजसेवी संस्था सुरु करतात. परंतु माहितीच्या अभावामुळे नोंदणी होत नसल्याचे सांगितले. सीए व धर्मादाय संस्थांच्या शंकांचे निरसन वक्त्यांनी केले. सीए अभिषेक धामणे यांनी प्रास्ताविक, तर सीए समीर लड्ढा यांनी संयोजन केले. विक्रांत सांळुखे यांनी आभार मानले.

