बालवयातच शिवाजी महाराजांचे विचार रुजावेत

Date:

पुणे : शाळा महाविद्यालयातच विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श गुण समजावून सांगितले पाहिजे आणि त्यांचे विचार रुजवायला हवेत तरच येणारी पिढी चांगल्या विचारांची घडेल. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार देशात रुजले असते तर आज देशात ज्या विदारक घटना घडत आहेत त्या घडल्या नसत्या, असे प्रतिपादन सोलापूर इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष डॉ. सोपान जावळे यांनी केले.
येवलेवाडी येथील के जे शिक्षण संस्थेच्या आर्किटेक्चर महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. यावेळी केजे शिक्षण संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष कल्याण जाधव, बी एस केशव, व्यवस्थापकीय संचालक हर्षदा जाधव, विभावरी जाधव, संचालक डॉ. एच. के. अभ्यंकर, डॉ. व्हि. जे.काखंडकी, प्राचार्य डॉ. सुहास खोत, डॉ. निलेश उके, डॉ. बी. एम शिंदे, डॉ. रवींद्र गडगे, प्रा. गणेश इंगोले, डॉ. संजय चौधरी, प्रा. सुनील घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षण प्रसाराचे काम करणाऱ्या हर्षदा देशमुख-जाधव यांचा सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. सोपान जावळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
डॉ. सोपान जावळे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व सामान्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. आज मात्र प्रत्येकजण स्वःतचाच विचार करतो. शिवाजी महाराजांच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत नव्हत्या. कारण ते शेतकऱ्यांचे राजे होते. महाराजांनी मावळ्यांना व्यसनापासून, नाच गाण्यापासून दूर ठेवले म्हणून मैलोनमैल प्रवास करून त्यांचे मावळे युद्ध जिंकत होते.”
कल्याण जाधव म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर करायचा असेल, तर त्यांचे अनुकरण करणे गरजेचे आहे. शिवाजी महाराजांनी महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कठोर शिक्षेची तरतूद केली होती, त्यामुळे आज जसे महिलांवर अत्याचार होत आहेत तसे होत नव्हते. आपल्या सरकारनेही महिला अत्याचारासंदर्भात कठोर कायदे करायला हवेत.”
नृत्यातून घडले भारतीय एकात्मतेचे दर्शन
विविध प्रकारच्या वेशभूषा, शिवाजींचा पाळणा, लेजीम, शस्त्रपूजन, मर्दानी खेळाचे सादरीकरण करत विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. प्रसंगी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाने भारतीय संस्कृती आणि एकात्मतेचे दर्शन घडले. ‘भारत हम को जान से प्यारा है’, ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’, ‘सून मितवा, सून मितवा’, ‘ख्वाजा मेरे ख्वाजा दिल मै समा जा’, ‘देश रंगीला, देश रंगीला’ अशा गाण्यावर नृत्य सादरीकरण झाले. शिवाजी महाराजांवरील पोवाड्याने वातावरणात उत्साह भरला. शीख, ख्रिश्चन, पंजाबी, साऊथ इंडियन, महाराष्टीयन वेशभूषाच्या माध्यमातून फॅशन शो सादर झाला.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार...

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...