‘कन्सर्न फॉर मेंटल हेल्थ’कडून मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत प्रतिनिधींना प्रशिक्षण

Date:

पुणे : मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज यांच्यातर्फे तीन दिवसीय मानसोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लंडनमधील ‘कन्सर्न फॉर मेंटल हेल्थ’च्या टीमने मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिनिधींना मानसोपचाराचे प्रशिक्षण देण्यात आले. मॉडेल कॉलनीतील सिम्बायोसिस संस्थेत हे प्रशिक्षण शिबीर झाले. भारतीयांच्या चांगल्या मानसिक आरोग्यासाठी मुकुल माधव फाउंडेशन सहा वर्षांपासून हा कार्यक्रम राबवित आहे. या शिबीरामध्ये प्राथमिक आरोग्यसेवा क्षेत्रात काम करणारे डॉक्टर्स, मानसोपचार तज्ञ, परिचारिका, विशेष शिक्षक आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या इतर कार्यकर्त्यांना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या निकषांनुसार प्रशिक्षण दिले जाते. आजवर ६५० पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षित करण्यात आले आहे.

प्रशिक्षणार्थीना वर्ल्ड सायकिअ‍ॅट्रिक असोसिएशनतर्फे मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. लंडन येथून आलेल्या डॉ. गझला अफझल, मौडस्ली हॉस्पिटलच्या डॉ. मिलाविक, मानसोपचार तज्ञ डॉ. रम्या मोहन, मानसोपचारतज्ञ डॉ. विल्यम शनाहन, फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया आदी उपस्थित होते. डॉ. गझला अफजल म्हणाल्या, “मानसिक आजारांबाबत प्रागतिक दृष्टिकोन असून, या उपचारांचे चांगल्या पद्धतीने वितरण होत आहे. परंतु, बालकांच्या मानसिक आजारांवर उपचार करणार्‍या मानसोपचार तज्ज्ञांची भारतात मोठी कमतरता आहे. त्यामुळेच अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून अद्ययावत प्रशिक्षण देणे आवश्यक वाटते.”

यावेळी बोलताना मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, “मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत नर्स, मानसोपचारतज्ज्ञ आणि मानसिक आरोग्य क्षेत्रातील इतर व्यावसायिकांसाठी हे प्रशिक्षण आहे. या पाच वर्षीय भागीदारीमुळे लोकांमध्ये मानसिक आरोग्यविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली आहे. भारतातील मानसिक आरोग्यसेवेच्या परिस्थितीत सुधारणा करण्याच्या उद्दिष्टाने आम्ही एक सामाजिक व्यासपीठ उभे करण्याचा विचार करत आहोत. ससूनच्या सहकार्याने जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले होते. मानसिक आजाराची लक्षणे आढळल्यास जिल्हा रुग्णालयामार्फत औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

किडनी विक्री प्रकरणातील सावकरांवर कधी कारवाई करणार? – वडेट्टीवार

मुंबई- विदर्भातील शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी किडनी विकवी लागल्याचा प्रकार...

DGCA कडून विमान कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न:अजित पवार अपघात प्रकरणी रोहित पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार...

घरकुल लाभार्थ्यांना तीन पावसाळे उलटले तरी घर मिळाली नाही,जनाची नाही तर मनाची ठेवा – वडेट्टीवार

मुंबई- राज्यातील घरकुल योजनेतील घरं मंजूर होऊनही गेल्या तीन...

अमेरिकेत हिमवादळामुळे 11 हजार विमानांची उड्डाणे रद्द:5 लाख घरांची वीज गेली, 153 वर्षांत पहिल्यांदाच वर्तमानपत्र छापले जाऊ शकले नाही

वॉशिंग्टन डीसी-अमेरिकेत जोरदार वाऱ्यांमुळे आणि प्रचंड बर्फवृष्टीमुळे विमानतळावरील धावपट्ट्या...