सामाजिक स्तर उंचावण्यासाठी ‘सीएसआर’ प्रभावी- राकेश बवेजा

Date:

पुणे : “समाजाच्या विविध स्तरांतील प्रश्न सोडविण्यासाठी शासनाबरोबरच सामाजिक संस्थांचे योगदान मोठे आहे. जे काम शासन करू शकत नाही, ते काम करण्याची जबाबदारी सामाजिक संस्थांची असते. त्यासाठी ‘सीएसआर’च्या माध्यमातून या संस्थांना आर्थिक पाठबळ मिळणे आवश्यक आहे. ‘सीएसआर’मुळे सामाजिक कार्याला प्रोत्साहन देण्यासह समाजाच्या विकासाचा स्तर उंचावण्यास मदत होते. त्यामुळे उद्योगांनी आपला ‘सीएसआर’ सामाजिक संस्थांना द्यावा,” असे मत फियाट इंडिया लिमिटेडचे उपाध्यक्ष (ऑपरेशन, सीएसआर) राकेश बवेजा यांनी व्यक्त केले.

लायन्स क्लब्स इंटरनॅशनल आणि कर्वे सामाजिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील ७० सामाजिक संस्था, कॉर्पोरेट कंपन्या आणि उद्योग संस्था यांना एकत्र आणण्याकरिता आयोजिलेल्या ‘सीएसआर संमेलना’मध्ये बवेजा बोलत होते. कर्वे सामाजिक सेवा संस्था येथे झालेल्या या संमेलनाला लायन्स क्लब्जचे प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, उपप्रांतपाल सीए अभय शास्त्री, हेमंत नाईक, कर्वे इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. दीपक वलोकर, डॉ. महेश ठाकूर, परिषदेचे प्रमुख समन्वयक अनिल मंद्रुपकर, सहसमन्वयक किशोर मोहोळकर, तेजस्विनी सवाई, काशिनाथ येनपुरे उपस्थित होते. सर्व भागीदारांमध्ये संवाद घडवून आणणे, ‘सीएसआर’च्या प्रक्रियेबद्दल माहिती देणे आणि महत्वाचे म्हणजे भागीदारांमध्ये विश्वासवृद्धी व्हावी यासाठी परिषद आयोजित करण्यात आली होती. अनिल मंद्रुपकर यांनीही ‘सीएसआर’ संमेलनाची उद्दिष्टे सविस्तरपणे सांगितली.

राकेश बवेजा म्हणाले, “समाजात बदल घडविणे ‘सीएसआर’मुळे शक्य होत आहे. ‘सीएसआर’चा विनियोग करण्याच्या बाबतीत महाराष्ट्र देशातील क्रमांक एकचे राज्य आहे. वर्षाला साधारणपणे २५०० कोटी रुपये या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रात खर्च केले जातात. कॉर्पोरेट व्यवस्थेमध्ये कामाचा वेग हा अतिशय महत्वाचा असतो. याबाबतत शासकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेमध्ये असलेल्या त्रुटी ‘सीएसआर’च्या माध्यमातून भरून काढता येतात. २०१३ पासून कॉर्पोरेट कायद्याखाली कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व हे उद्योग संस्थांसाठी आणि उद्योगविश्वासाठी समाजाचे ऋण चुकवण्याचे किंवा समाजाप्रती काहीतरी करण्यासाठीचे एक उत्तम साधन झाले आहे.”

डॉ. महेश ठाकूर यांनी ‘सीएसआर’ संकल्पनेविषयी बोलताना पाच वर्षांत ‘सीएसआर’अंतर्गत झालेल्या कामाचा आढावा आणि सामाजिक संस्थांसाठी नव्याने तयार झालेल्या संधी यासंबंधी मागर्दर्शन केले. एखाद्या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचे आव्हान त्यांनी एनजीओना केले तसेच एनजीओसाठी प्रशिक्षित आणि व्यावसायिक सामाजिक कार्यकर्त्यांची गरज त्यांनी व्यक्त केली. चयन पारधी यांनी ‘एनजीओ’च्या क्षमता बांधणीवर, तर पर्सिस्टंट्च्या योगिता आपटे यांनी एनजीओ निवडण्याची प्रक्रिया, अर्ज करण्याची प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती दिली. कमिन्स इंडियाचे अमित लेले, सुदर्शन केमिकल्सच्या माधुरी सणस, फियाट इंडिया लि.चे प्रदीप पाटील, ओरलिकॉन ब्लेझर्स लि.च्या वेंदाती पाटील यांनी कंपनीजद्वारे सीएसआर अंतर्गत करण्यात आलेल्या कामासंबंधी माहिती दिली.

यावेळी प्रदीप पाटील (फियाट इंडिया प्राव्हेट लिमिटेड), अनिल मंद्रुपकर (कमिन्स इंडिया), रमेशबाबू व विकास कौशिक (माझगाव डॉक लिमिटेड), माधुरी सणस (सुदर्शन केमिकल्स), सौरभ गाडगीळ ( पी.एन. गाडगीळ ज्वेलर्स), सिद्धार्थ यवलकर (टाटा टेक्नॉलॉजी), ऋषी आगरवाल व दीप्ती कांबळे (एसएलके ग्लोबल सोल्युशन्स लिमिटेड), प्रणव चौगुले (आयडीएफसी फर्स्ट बँक), वेदांगी पाटील (ओरलीकॉन ब्लेझर्स लिमिटेड) यांनी कंपनीतर्फे ‘सीएसआर अवार्ड’ चा स्वीकार केला व सन्मानित करण्यात आले. सर्व उपस्थितांनी आयोजकांची प्रशंसा केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार...

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...