Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘एआयटी’च्या विद्यार्थ्यांची ‘एनईसी हॅकेथॉन’मध्ये बाजी

Date:

-दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत पहिल्या तीनही क्रमांकाच्या बक्षिसावर मोहोर उमटवत ऐतिहासिक कामगिरी

पुणे : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) दिल्ली येथे झालेल्या ‘एनईसी हॅकॅथॉन’मध्ये दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारत ऐतिहासिक कामगिरी केली. स्पर्धेतील अनुक्रमे प्रथम, व्दितीय आणि तृतीय अशा तीनही क्रमांकावर मोहर उमटवत एकूण पाच लाखांचे बक्षीस पटकावले आहे. ‘एआयटी’मधून उत्तीर्ण झालेल्या स्वस्तिक श्रीवास्तव, रोहन चौगुले, रजत रावत आणि अनिरुद्ध मुरली यांच्या ‘ड्रुपल’ या संघाने प्रथम क्रमांक मिळवत २.५ लाखाचे बक्षीस जिंकले. व्दितीय क्रमांकाचे बक्षीस (१.५ लाख) ‘एआयटी’मध्ये तृतीय वर्षात शिकणाऱ्या शैलेश, अर्पित, शुभम, शिवम या विद्यार्थ्यांच्या ‘वी कोड’ने या संघाने जिंकले, तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक (१ लाख) तृतीय वर्षात शिकणाऱ्या सागर, अशोक या विद्यार्थ्यांच्या ‘वन इन सेंटिलीयन’ या संघाने जिंकले.
‘एनईसी कॉर्पोरेशन आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या (एमएचआरडी) कॉमन सर्व्हिस सेक्टर (सीएससी) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच ही स्पर्धा आयआयटी दिल्ली येथे पार पडली. ‘ग्रामीण शिक्षणाचे डिजिटायझेशन’ ही या हॅकॅथॉन स्पर्धेची मध्यवर्ती संकल्पना होती. स्पर्धेसाठी कोणत्याही वयोगटातील जास्तीत जास्त चार सदस्यांच्या संघांना परवानगी देण्यात आली होती. यामध्ये ४००० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. आयआयटी, आयआयआयटी, एनआयटी यांसारख्या नामांकित शिक्षणसंस्थांतील विद्यार्थ्यांसह कॉर्पोरेट्समधील तज्ज्ञ प्रोग्रामरचाही समावेश होता.
डिसेंबर २०१९ मध्ये झालेल्या प्राथमिक फेरीतून ४० संघांची निवड करण्यात आली होती. हॅकॅथॉनची अंतिम फेरी ११ व १२ जानेवारी २०२० रोजी दिल्ली येथे झाली. ‘एआयटी’च्या आठपैकी सात संघांची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. अनेक प्रतिष्ठित स्पर्धा जिंकून ‘एआयटी’चे संघ गेल्या तीन वर्षांत राष्ट्रीय स्तरावरील हॅकाथॉनमध्ये यश मिळवत आहेत. यामध्ये ‘टीसीएस-पॅन’, आयआयटी हॅकथॉन, बार्कलेज हॅकथॉन, व्हिस्टारा एव्हिएशन हॅकथॉन, एच-अको हॅकाथॉन, हैकर्थ अ‍ॅडकाट, एनएसई हॅकथॉन आदी स्पर्धांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल ‘एआयटी’चे संचालक ब्रिगेडियर (निवृत्त) अभय भट, प्राचार्य डॉ. बी. पी. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
‘एआयटी’मध्ये ओपन सोर्स क्लब (ओएसएस क्लब) आणि स्पर्धात्मक कोडिंग क्लबसारखे क्लब आहेत; येथून विद्यार्थ्यांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. प्रा. अनुप कदम आणि प्रा. एम. बी. लोणारे यांच्यासह वरिष्ठ विद्यार्थी मित्रांकडून मार्गदर्शन मिळते. संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. सुनील ढोरे आणि माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. संगीता जाधव यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन दिले जाते. महाविद्यालय आणि प्राध्यापकांनी घेतलेल्या परिश्रमाचा परिणाम म्हणून मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅमेझॉन, ओरॅकल, बार्कलेज, क्रेडिट सुइस यांसारख्या नामवंत कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट्स होते.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पीएमआरडीए प्रकल्पातून २७ गावांना मिळणार प्रगत सांडपाणी व्यवस्थापन!

१६ क्लस्टर्समध्ये ₹१,२०९ कोटींचा खर्च; पर्यावरण रक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान...

संस्कृती, परंपरा जपत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न : श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले

९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचा शुभारंभ सातारा :...

‘नवा भारत समजून घ्यायला हवा’

पुणे, १६ डिसेंबरभारत महाशक्ती म्हणून पहिल्यांदाच सिद्ध होत असल्यामुळे...