वंचिताना मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक राजू इनामदार यांचे मत; वंचित विकासतर्फे ‘आपुलकी पुरस्कार’ प्रदान

Date:

पुणे : “सामाजिक काम करताना लोकांच्या मनातल्या गोष्टी आपण जाणून घ्यायला हव्यात. समाजातील दुर्लक्षित घटकांना, वंचितांना सक्षम करणे, त्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचा आत्मविश्वास वाढविणे महत्वाचे आहे. त्यासाठी आपण सर्वानी पुढाकार घ्यायला हवा,” असे मत सामाजिक कार्यकर्ते अझीम उर्फ राजू इनामदार यांनी व्यक्त केले
जाणीव संघटना व वंचित विकास संस्थेतर्फे राजू इनामदार यांना ‘आपुलकी पुरस्कार’ देऊन उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते जयंत नातू यांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी विश्वशक्ती इंटरनॅशनल फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त डॉ. दत्ता कोहिनकर, सौ. स्वाती नातू, वंचित विकासचे संस्थापक विलास चाफेकर, संचालिका मीना कुर्लेकर व सुनीता जोगळेकर, डॉ. मधुसूदन घाणेकर, मीनाक्षी नवले, चैत्राली वाघ आदी उपस्थित होते.
 
राजू इनामदार म्हणाले, “वंचित विकास संस्थेप्रमाणेच आम्हीही वंचितांसाठी काम करतो. हा पुरस्कार म्हणजे आपल्या लोकांकडून मिळालेली कौतुकाची थाप आहे. अदृश्य स्वरूपाच्या कामांकडे लोक फारसे लक्ष देत नाहीत. परंतु वंचित विकासने या गोष्टी जाणल्याबद्दल संस्थेचा आभारी आहे. काम करत असताना अनेक अडचणी येतात. परंतु यात लोकांचा सहभाग आणि मदत पाहून पुन्हा नवीन उर्मी मिळते. माणसाने मनाची नाती निर्माण करायला हवीत. बोललेले सगळ्यांनाच ऐकू येते. मात्र, न बोललेलेही आपल्याला ऐकता आले पाहिजे.”
जयंत नातू म्हणाले, “पाठीवर मिळालेली शाबासकी ही कार्यकर्त्याच्या दृष्टीने खूप महत्वाची असते. कुठलेही पाठबळ नसताना समाजातील विविध घटकांना आवश्यक वस्तू पुरवून त्यांना मदत करणे त्यांच्यासाठी काम करुन त्यांना सक्षम बनविण्याचे महत्वपूर्ण काम राजू इनामदार करत आहेत. ही कौतुकाची बाब आहे.”
डॉ. दत्ता कोहिनकर म्हणाले, “कोणतेही काम करण्यासाठी आर्थिक भांडवल खूप महत्वाचे आहे. म्हणूनच प्रत्येकाने सामाजिक कार्यात सहभाग घ्यायला हवा जमेल तेवढी मदत करायला हवी. निस्वार्थीपणे केलेल्या कामाला संस्थेने पुरस्काराच्या माध्यमातून कौतुकाची थाप मिळाली आहे.”
प्रास्ताविक मीनाताई कुर्लेकर यांनी केले. सूत्रसंचलन व आभार देवयानी गोंगले यांनी मानले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाइपलाइन गॅस व सीएनजी वितरणासाठी केंद्र सरकारचा नवा आदेश: विना अडथळा खोदकाम करता येणार

पुणे : केंद्र सरकारने देशभरात नैसर्गिक गॅस व पेट्रोलियम...

पुण्यात ४२४ प्रकरणांत गंभीर फेरफार अनियमितता:महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील ‘कलम १५५’ चा गैरवापर

दोषींवर निलंबनासह कठोर कारवाईचे महसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश जबाबदार...

हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

शाहिरी-गायन-वादन सादरीकरणातून स्वराज्य संकल्पनेचा जागर पुणे, दि. २६ मार्च :महाराष्ट्र...

शिवसृष्टी प्रकल्पासह शहराच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका – नगरसेवक हर्षवर्धन मानकर

पुणे महानगरपालिकेच्या सन २०२६–२७ च्या अंदाजपत्रकावर झालेल्या चर्चेदरम्यान नगरसेवक...