संत कंवरम रॉयल्सने पटकावले ‘सिंधी प्रीमिअर लीग २’चे विजेतेपद

Date:

सिंधी तरुणांकडून सामाजिक भान जपत विद्यार्थी सहायक समिती, सुहृद मंडळ संस्थेला प्रत्येक ५० हजारांची देणगी
पुणे : संत कंवरम रॉयल्सने मोहेंजोदारो वॉरियर्सचा १६ धावांनी पराभव करीत ‘सिंधी प्रीमियर लीग सीझन २’चे विजेतेपद पटकावले. पिंपरीतील मृणालगार्डनच्या लॉन्सवर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना संत कंवरम रॉयल्सने निर्धारित १२ शतकात ६ गडी गमावत ६० धावा केल्या. पंकज रामवानीने सर्वाधिक २३ (चेंडू २९) धावा केल्या. त्याला धीरज धोडवानी (१४) आणि परम नानकानी (१०) यांनी चांगली साथ दिली. कुणाल रामचंदानी (१५ धावांत २ बळी) आणि सोमेश गिडवाणी (१२ धावांत १ बळी) यांनी टिच्चून गोलंदाजी केली.
विजयासाठी १२ षटकांत ६१ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मोहेंजोदारो वॉरियर्सची सुरवात अडखळत झाली. परम नानकाणीच्या दुसऱ्याच चेंडूवर कर्णधार बंटी मेघनानी शून्यावर त्रिफळाबाद झाला. तर त्यापुढच्याच कुणाल मोटवानीने टाकलेल्या षटकांत हर्ष रेल्वानीही एक धाव काढून त्रिफळाचित झाला. दहाव्या षटकांत राहुल अडवाणी शून्यावर धावबाद झाला आणि मोहेंजोदारो वॉरिअर्सचा डाव संपुष्टात आला. कुणाल रामचंदनी, प्रकाश आसुदानी व सोमेश गिडवाणी यांनी प्रत्येकी सर्वाधिक ७ धावा केल्या. परम नानकानी (१४ धावांत २ बळी) तर धीरज धोडवानी (१४ धावांत १ बळी) व कुणाल मोटवानी (७ धावांत १ बळी) यांनी चांगली गोलंदाजी केली. स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा धीरज धोडवानीने (२९४) केल्या, तर सर्वाधिक बळी विकी चंचलानीने (१६) घेतले. फेअर प्ले अवार्ड इंडस डायनॉमस संघाने मिळवले.
सिंधी तरुणांना खेळांसाठी प्रोत्साहित करण्याच्या, तसेच सिंधी संस्कृतीचे जतन आणि सामाजिक भावनेतून सामाजिक संस्थांना मदत या उद्देशाने ‘सिंधी प्रीमिअर लीग’चे आयोजन करण्यात आल्याचे संयोजक हितेश दादलानी यांनी सांगितले. माजी रणजी क्रिकेटपटू कैलास घटानी, जयहिंद हायस्कुलचे माजी प्राचार्य पटेल जवहाराणी यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले. उद्घाटनप्रसांगीं क्रिकेटपटू रोहित मोटवानी, उद्योजक गणेश कुदळे, संयोजक कन्वल खियानी, हितेश दादलानी, कमल जेठानी, अंकुश मुलचंदानी, नरेश नशा, करण अस्वाणी, अवि तेजवानी, अवि इसरानी, रवी दर्यानी आदी उपस्थित होते. सिंधी प्रीमिअर लीग फेसबुक पेजवरून याचे थेट प्रक्षेपण झाले. १६ दिवसांच्या या स्पर्धेत १२ संघ सहभागी झाले होते.
विद्यार्थी सहायक समितीच्या वतीने कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, विश्वस्त दिनकर वैद्य, नंदकुमार तळेकर यांनी, तर सुहृद मंडळाच्या वतीने चेअरमन श्रीकांत सरपोतदार, अनुराधा फाटरपोड, रजनी फडके यांनी देणगीचा धनादेश स्वीकारला. यावेळी खेळाडूंबरोबर त्यांची मुले मैदानात आल्याने सर्वांचेच लक्ष वेधले जात होते. या स्पर्धेतून निधी उभा करून तो सामाजिक संस्थांना देणगी म्हणून देण्यात आला. त्यामध्ये ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांकरिता कार्यरत विद्यार्थी सहायक समिती आणि मूकबधिरांसाठी कार्यरत सुहृद मंडळ या संस्थांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची देणगी देण्यात आली.
या स्पर्धेत सहभागी प्रत्येक संघाचे नाव सिंधी समाजाशी आणि संस्कृतीशी निगडित होते. त्यामध्ये मस्त कलंदर (गीता बिल्डर्स, मयूर तिलवानी), सुलतान ऑफ सिंध (आशुतोष चंदीरमणि, चंदीरमणि असोसिएट्स), मोहेंजोदरो वॉरियर्स (मिलेनियम सेमीकंडक्टर, हरीश अभिचंदानी), सिंधफूल रेंजर्स (अनूप झमटानी, झमटानी ग्रुप), एसएसडी फाल्कन (विकी सुखवानी, सुखवानी लाइफस्पेस), इंडस डायनामॉस (सुमित बोदानी, शगुन टेक्सटाईल), दादा वासवानीज ब्रिगेड (अनिल अस्वाणी, अस्वाणी प्रमोटर अँड बिल्डर), झुलेलाल सुपरकिंग्ज (पियुष जेठानी, जेठानी ग्रुप), हेमू कलानी ग्लॅडिएटर्स (बिपिन डाखनेजा, ट्रिओ ग्रुप), गुरुनानक नाइट्स (प्रकाश रामनानी, पीव्हीआर टाईल्स वर्ल्ड), संत कंवरम रॉयल्स (राहुल लाडकानी, व्हीआरए रोहित सेल्स), आर्यन युनायटेड (राजीव मोटवानी, रोहित इन्फ्रा) अशी या संघांची नावे होती.
सुखवानी लाईफ स्पेसेस, बालाजी होम्स (चंडीरामणी असोसिएट्स), नुरिया होमेटेल हॉस्पिटॅलिटी (सागर व निखिल सुखवानी), रवि बजाज आणि रोहित तेजवानी, झिरो ग्रॅव्हिटी बार अँड किचन (ऋषी तेजवानी), उत्तम केटरर्स (नवजीत कोचर), बॉम्बे सॅन्डविच (मनीष मनसुखानी), विशाल प्रॉपर्टीज (विशाल तेजवानी) अँड सुखवानी बिल्डर्स (सुरेश सुखवानी), ट्रिनिटी ग्रीन्स (हितेश जेठानी, सागर मुलचंदानी), राजनीता इव्हेंट्स (निखिल अहुजा),  क्लासिक कलेक्शन (नीरज चावला), जितू पहलानी (गिफ़्ट हॅम्पर्स) यांचे या स्पर्धंसाठी सहकार्य लाभले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्राजक्ता पटवर्धन यांना भाऊसाहेब स्मृती पाटणकर स्मृती पुरस्कार

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे रविवारी गौरव पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे मराठीतील आद्य...

अडचणींना सामोरे जात फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घ्या : गजाला शेख

गजाला शेख लिखित ‘द फिनिक्स पाथ’ पुस्तकाचे प्रकाशन पुणे :...

शशिकांत सुतारांच्या पुत्राने ठाकरेंना दिला मोठा हादरा, संजय भोसलेंसह भाजपात केला प्रवेश

मुरलीधर मोहोळ,गणेश बिडकर,श्रीनाथ भिमाले यांची विरोधकांची बलस्थाने काबीज करणारी...

प्रशांत जगताप स्वार्थी: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुभाष जगताप म्हणाले…

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार , प्रशांत जगताप यांनी...