निरोगी, सुदृढ आयुष्यासाठी नियमित व्यायाम गरजेचा- ब्युला कौलगे

Date:

पुणे : बदलत्या जीवनशैलीचे मनुष्याच्या जीवनावर वेगवेगळे परिणाम होत आहेत. अशा परिस्थितीत ताण तणाव दुरु करण्यासाठी तसेच निरोगी आणि सुदृढ राहण्याकरीता नियमित व्यायाम गरजेचे आहे. शाळा-महाविद्यालयातील विदयार्थी, तरुण, नोकरदार, महिला, जेष्ठ सर्वांनीच व्यस्त जीवनशैलीतून व्यायामासाठी थोडा वेळ द्यावा, शरीराची हालचाल होईल असे साधे सोपे व्यायाम प्रकार करावेत,” असा सल्ला सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठातील शारिरीक शिक्षण आणि क्रीडा केंद्र सहाय्यक संचालक ब्युला कौलगे यांनी दिला.
मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाच्या वतीने ‘आरोग्यदायी व्यायाम’ या विषयावर ब्युला कौलगे यांचे प्रात्यक्षिकासह व्याख्यान झाले. एसएम जोशी फाऊंडेशनच्या चर्चा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात कौलगे यांनी उपस्थितांकडून सर्वांगाची हालचाल होईल अशा साध्या सोप्या व्यायाम प्रकारचे प्रात्यक्षिक करून घेतले. प्रेक्षकांनी देखील उत्साहाने यात सहभाग घेतला. यावेळी मराठी विज्ञान परिषद पुणेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ, उपाध्यक्ष डॉ. नीलिमा राजुरकर, विनय र. र, वसंत शिंदे, डॉ. सुजाता बरगले, संजय मा. क यांच्या सह व्यायामाची आवड असणाऱ्यांनी, विज्ञान प्रेमींनी आणि अभ्यासकांनी व्याख्यानाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
”तरुण तसेच जेष्ठांमध्ये व्यायाम करण्याबाबत जागृती वाढत आहे. प्रत्येकाची शारीरिक प्रकृती भिन्न असल्याने स्वतःच्या क्षमतेनुसार व्यायाम करावा. माणसाचे वय जस जसे वाढत जाते तस तसे व्यायामाचं महत्त्व अधिक होत जाते. त्यामुळे वयोवृध्दांनी देखील व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायामासंबधित विविध मोबाईल ऍप उपलब्ध आहेत, त्याचा वापर होताना दिसून येत आहे. युवा वर्गाने देखील सायकल चालवणे, ट्रेकिंग, नृत्य करणे, योगासने करणे, जिमिंग, पोहणे असे आपल्या आवडीचे कोणतेही प्रकार निवडावेत आणि ते नियमित करावेत, यामधून शरीराची खूप हालचाल होते भरपूर व्यायाम होतो. परंतु एखादी दुखापत झाल्यास व्यायाम ती पूर्ण बरी झाल्याशिवाय व्यायाम करू नये.”
राजेंद्रकुमार सराफ म्हणाले,”तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जसे फायदे झाले तसे तोटे हि झाल्याचे पाहावयास मिळतात. घरातील विविध प्रकारच्या कामे करतांना व्यायाम होत असे, परंतु आता सर्व कामे मशीनद्वारे करण्यात येतात. तसेच बैठेकाम जास्त वाढल्यामुळे शरीराची हालचाल होत नाही. याकडे सर्वांनी लक्ष द्वावे. दिवसातील किमान थोडा वेळ व्यायामा करीत द्यावा.”
डॉ. नीलिमा राजुरकर यांनी प्रस्तावना केली.  दीपाली अकोलकर यांनी आभार मानले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

किडनी विक्री प्रकरणातील सावकरांवर कधी कारवाई करणार? – वडेट्टीवार

मुंबई- विदर्भातील शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी किडनी विकवी लागल्याचा प्रकार...

DGCA कडून विमान कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न:अजित पवार अपघात प्रकरणी रोहित पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार...

घरकुल लाभार्थ्यांना तीन पावसाळे उलटले तरी घर मिळाली नाही,जनाची नाही तर मनाची ठेवा – वडेट्टीवार

मुंबई- राज्यातील घरकुल योजनेतील घरं मंजूर होऊनही गेल्या तीन...

अमेरिकेत हिमवादळामुळे 11 हजार विमानांची उड्डाणे रद्द:5 लाख घरांची वीज गेली, 153 वर्षांत पहिल्यांदाच वर्तमानपत्र छापले जाऊ शकले नाही

वॉशिंग्टन डीसी-अमेरिकेत जोरदार वाऱ्यांमुळे आणि प्रचंड बर्फवृष्टीमुळे विमानतळावरील धावपट्ट्या...