‘सीए’ होण्यासाठी परिश्रम, आत्मविश्वास, सातत्य, चिकाटी आवश्यक-प्रफुल्ल छाजेड

Date:

पुणे : ”सनदी लेखापाल (सीए) होण्यासाठी परिश्रम, आत्मविश्वास, सातत्य आणि चिकाटी ही चतुःसूत्री अंगीकृत करणे आवश्यक आहे. सनदी लेखापाल क्षेत्रात कोणताही ‘शॉर्टकट’ चालत नाही. त्यामुळे प्रात्यक्षिक आणि सैद्धांतिक ज्ञान आत्मसात करण्याबरोबरच नवीन बदल आणि तंत्रज्ञानाचा वापर स्वीकारला पाहिजे. हे एकमेव क्षेत्र आहे, जिथे कोणताही भेदभाव होत नाही. ज्याच्याकडे क्षमता आहे, तो या क्षेत्रात यशस्वी होतो,” असे प्रतिपादन दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे (आयसीएआय) राष्ट्रीय अध्यक्ष सीए प्रफुल्ल छाजेड यांनी केले.
दि इन्स्टिटयूट ऑफ चार्टड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) बोर्ड ऑफ स्टडीज आणि ‘आयसीएआय’ पुणे विभागाच्या वतीने सीएच्या विद्यार्थ्यांकरिता आयोजित दोन दिवसीय आतंरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन प्रफुल्ल छाजेड यांच्या उपस्थितीत झाले. राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे होत असलेल्या या परिषदेवेळी इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्सच्या व्यवस्थापकीय संचालिका सीए आर. एम. विशाखा, ‘आयसीएआय’चे उपाध्यक्ष सीए अतुलकुमार गुप्ता, बोर्ड ऑफ स्टडीजच्या आणि आंतरराष्ट्रीय परिषदेच्या अध्यक्ष सीए केमिशा सोनी, उपाध्यक्ष सीए दुर्गेश काब्रा, वंदना नागपाल, ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य, परिषदेचे संचालक सीए चंद्रशेखर चितळे, ‘रिजनल कौन्सिल मेंबर’ सीए आनंद जाखोटिया, सीए यशवंत कासार, पुणे शाखेच्या अध्यक्षा, परिषदेच्या समन्वयक सीए ऋता चितळे, उपाध्यक्ष सीए अभिषेक धामणे, सचिव समीर लड्ढा, खजिनदार काशिनाथ पाठारे आदी उपस्थित होते. भारतासह नेपाळ, श्रीलंका येथून जवळपास ३००० सीएचे विद्यार्थी या परिषदेत सहभागी झाले आहेत.
सीए प्रफुल्ल छाजेड म्हणाले, “देशाच्या विकासात ‘सीए’ची भूमिका महत्त्वाची असून, त्याला खूप सन्मान आणि अधिकार आहेत. कोणतेही आरक्षण किवा स्त्री-पुरुष असा भेद येथे नाही. गुणवत्तेवर आधारित कोणीही या क्षेत्रात यश मिळवू शकतो. सीएचा अभ्यासक्रम आंतराष्ट्रीय मापदंडाचा विचार करून तयार होतो. वेगवेगळ्या शाखेतील पदवी घेतलेले विद्यार्थी सीएचा अभ्यास करीत करत परीक्षा देत आहेत. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरील अफवांकडे लक्ष न देता अभ्यासावर ध्यान द्यावे. ‘सीए’ परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून, समाजात सीएला प्रतिष्ठा आहे. अर्थव्यवस्थेच्या प्रगतीमध्ये आपला थेट सहभाग राहणार आहे, या भावनेने विद्यार्थ्यांनी सीए क्षेत्रात यावे.”
विशाखा म्हणाल्या, ”सीएच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासोबत आर्टिकलशीपही तितकीच महत्त्वाची आहे. या माध्यमातून विद्यार्थ्याना प्रात्यक्षिक ज्ञान मिळते. अभ्यासक्रमासोबत इतर ज्ञानही मिळवले पाहिजे. त्याचा या क्षेत्रात उपयोग होतो. या क्षेत्रात काम करताना विश्वासार्हता अतिशय महत्वाची असते. सचोटी, प्रामाणिकपणा आणि पारदर्शक काम करण्याचे ध्याये ‘सीए’च्या विद्यार्थ्यांनी बाळगावे. काम करताना येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी बारकावे समजून घ्यायला हवेत. आपल्या क्षमता आणि कमतरता याचे मूल्यांकन करून उपलब्ध संधी आणि आव्हाने स्वीकारावीत.”
सीए केमिशा सोनी म्हणाल्या, “विद्यार्थ्यांना अभ्यासातील नव्या गोष्टी, तंत्रज्ञानाचा वापर आणि अभ्यासाचे अधिकाधिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. सीए परीक्षेसंबंधित सर्व साहित्य ऑनलाईन उपलब्ध करून दिले जात आहे. ई-पाठशाळासारखे उपक्रम उपयुक्त ठरत आहेत. ऑनलाईन टेस्ट, क्रॅश कोर्सेस, रिडींग रूम पोर्टल, जर्नल, प्रशिक्षण वर्ग आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला पाहिजे.”
अतुलकुमार गुप्ता म्हणाले, “परीक्षेचा अभ्यास करताना यश-अपयश या दोन्ही गोष्टीचा सामना करावा लागतो. अपयश मिळाल्यावर खचून न जाता पुन्हा जिद्दीने अभ्यास करा. स्वतःला प्रोत्साहन देत रहा.” दुर्गेश काबरा म्हणाले, ”विद्यार्थ्यांनी इतरांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःशी तुलना करावी. आपली प्रगती कशी होईल, याकडे लक्ष द्यावे. सीएच्या अभ्यासासाठी एकाग्रता खूप महत्त्वाची आहे.” सीए चंद्रशेखर चितळे, सीए यशवंत कासार यांनाही आपले मनोगत व्यक्त केले. सीए ऋता चितळे यांनी प्रास्ताविक केले. सीए अभिषेक धामणे यांनी स्वागत केले. सीए शर्वरी वाघ आणि सीए नेहा फडके यांनी सूत्रसंचालन केले. ऋषिकेश ढगेकर याने आभार मानले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

येरवडा कारागृहात 5 मोबाईल,2 पॉवर बँक,चार्जिंग वायर सापडली..

पुणे- येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न...

माझी गाणी आजही रसिकांच्या पसंतीत -सिनेगीतकार समीर अंजान

'एमआयटी एडीटी' विद्यापीठाच्या 'पर्सोना महोत्सवा'ची उत्साहात सांगता लोणी-काळभोर (पुणे)...

अंतरकचेरी व्हॉलीबॉल स्पर्धेत सलग दहा वर्षे विजेतेपदाची परंपरा कायम!

पिंपरी चिंचवड महापालिकेचा दणदणीत विजयपिंपरी : पुणे आंतर कचेरी...