श्री सालासर हनुमान चालीसा मंडळाच्या वतीने गौ-अन्नकोट, ४५ गोशाळांना पशुखाद्याचे वाटप

Date:

पुणे : प्रभु श्रीराम तसेच रामभक्त हनुमान यांच्या भक्तीचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या श्री सालासर हनुमान चालीसा मंडळ, पुणे यांच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही अनोख्या गौ-अन्नकोट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गोमातेचे, पशुखाद्याचे पूजन करून पुणे जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सुमारे ४५ गोशाळांना प्रत्येकी ५५० किलो पशुखाद्याचे वाटप करण्यात आले. सरकी पेंड, एच. पी. गोळी, भुस्सा, तूर चुनी, मका चुनी, चना कोळ, हिरवा चारा, गुळ, मीठ, हिरवा चारा आदी खाद्याचा यात समावेश आहे. माहेशवरी समाजातील बांधवांच्या माध्यमातून हा अनोखा उपक्रम राबविण्यात येतो.
गंगाधाम-शत्रुंजय मंदिर रस्त्यावरील गोयल गार्डन येथे झालेल्या या कार्यक्रमामध्ये पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे, उद्योजक शेखर मुंदडा व जळगावचे सामाजिक कार्यकर्ते सुनील झंवर आदी पाहुण्यांच्या हस्ते गोपूजन करण्यात आले. त्यानंतर पशुखाद्य मांडलेल्या अन्नकोटचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन केल्यानंतर गोशाळांच्या प्रतिनिधींना बोलावून प्रातिनिधिक स्वरूपात पशुखाद्य वितरित करण्यात आले. यावेळी रजत राठी व पुष्करणी भट्टड यांना युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रसंगी शामसुंदरजी कलंत्री, बंकटलालजी मुंदडा, पुष्पाजी विजयकुमार कासट, विष्णु चमाडिया, नरेश जालन, प्रकाश फोफळीया, महेश सहकारी बँक, शामसुंदर राठी, गणेश भुतडा, रत्नेश राठी, संगीता बिहानी, रविंद्र जाखोटिया, कन्हैयालाल श्रॉफ, गौरव मणियार या मान्यवरांनी या गो-अन्नकोटचे यजमानपद भुषविले.इंदौर येथील सुप्रसिध्द भजनगायक द्वारका मंत्री यांच्या भजनसंध्येने वातावरण भक्तिमय झाले होते. आपल्या सुरेल आवाजाने त्यांनी उपस्थित गो- भक्तांना मंत्रमुग्ध केले. हनुमानाच्या वेशात आलेल्या भक्तामुळे वातावरणात साक्षात भगवान हनुमान आल्याचे जाणवत होते. कार्यक्रमात माहेशवरी तसेच अन्य विविध समाजातील नागरिक मोठ्या संख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाचे वितरण करून झाली.

सामाजिक काम करण्याची इच्छा मनात असल्यास आपण कोणत्याही माध्यमातून करू शकतो, याचा आदर्श श्री सालासर हनुमान चालीसा मंडळाने समाजापुढे घालून दिला आहे, अशा शब्दात शेखर मुंदडा यांनी उपक्रमाचे कौतुक केले. सुनील झंवर यांनीही हा अतिशय अनोखा उपक्रम असल्याचे सांगून असे उपक्रम राबवायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माझी गाणी आजही रसिकांच्या पसंतीत -सिनेगीतकार समीर अंजान

'एमआयटी एडीटी' विद्यापीठाच्या 'पर्सोना महोत्सवा'ची उत्साहात सांगता लोणी-काळभोर (पुणे)...

अंतरकचेरी व्हॉलीबॉल स्पर्धेत सलग दहा वर्षे विजेतेपदाची परंपरा कायम!

पिंपरी चिंचवड महापालिकेचा दणदणीत विजयपिंपरी : पुणे आंतर कचेरी...

भारताला सेमिकंडक्टर स्वातंत्र्याची गरज-प्रा. डॉ. मंगेश कराड

एमआयटी एडीटी विद्यापीठात ‘सेमिकंडक्टर तंत्रज्ञानावर’ राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन पुणे : सध्या...

महावितरणला बिल्ड इंडिया इन्फ्रा अवॉर्ड

मुंबई, दि. २५ फेब्रुवारी २०२६: राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांना दिवसा...