पुणे : भारत सरकारद्वारा नोंदणीकृत इंडियन स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने ‘ओपन नॅशनल स्पोर्ट चॅम्पियनशिप’चे आयोजन करण्यात आले आहे. १४, १७, १९, २२, २५ वर्षाखालील अशा विविध वयोगटात येत्या १५, ते १७ नोव्हेंबर रोजी १४ वर्षावरील पुढील खेळाडूंसाठी बालेवाडी स्टेडियम, पुणे येथे ही खुली स्पर्धा होणार आहे, अशी माहिती ‘आयएसए’चे संस्थापक खजिनदार सुरेश हेमनानी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपाध्यक्ष कमल मलकानी, जनसंपर्क अधिकारी जयदेव डेम्बरा, विनोद मेघांनी, राजीव धलवानी आदी उपस्थित होते.
सुरेश हेमनानी म्हणाले, “सर्व स्तरातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ही नॅशनल ओपन चॅम्पियनशिप आहे. या चॅम्पियनशिपमध्ये अॅथलेटिक्स, कबड्डी, रोलर, स्केटिंग, कुस्ती, तायक्वांदो, कराटे, खो-खो, बॉक्सिंग, किक बॉक्सिंग, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बेसबॉल, बॅडमिंटन, वूशु आदी खेळांचा समावेश असून, देशभरातून हजारो खेळाडू या तीन दिवसीय स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूंना राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण व निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.”
या स्पर्धेत १४, १७, १९, २२, २५ वर्षाखालील व त्यावरील वयोगटातील खेळाडू सहभागी होऊ शकतात. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://indiansportsassociation.org/ या वेबसाईटवर भेट देऊ शकता किंवा पवनकुमार सिंग (९५४०२५२९१७), जयदेव डेंब्रा (७३५०५०२५२५) यावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.