महिला सक्षमीकरणासाठी ‘फ्लो हाफ मॅरेथॉन

Date:

पुणे : फेडरेशन ऑफ इंडियन चैंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीज लेडीज ऑर्गनाइजेशन अर्थात फिक्की फ्लोच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी येत्या डिसेंबरमध्ये ‘फ्लो हाफ मॅरेथॉन’ आयोजित करण्यात आली आहे. या मॅरेथॉनसाठी फिक्की फ्लो आणि ब्रिजस्टोन यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. फिक्की फ्लो पुणे चॅप्टरच्या चेअरपर्सन रितू प्रकाश छाब्रिया आणि ब्रिजस्टोनचे व्यवस्थापकीय संचालक पराग सातपुते यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी ब्रिजस्टोन तसेच फ्लो पुणे चॅप्टरचे अधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर गोल्ड स्पॉन्सर अशोक लीलँड, ब्रॉंझ स्पॉन्सर फिनोलेक्स इंड्स्ट्रीज आणि वॉटर पार्टनर विकिंग कॉर्पोरेशनमधील अधिकारी उपस्थित होते.
रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, “या सामंजस्य करारांतर्गत समाजाच्या विविध स्तरातून येणाऱ्या महिलांना स्वावलंबी होण्यासाठी शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण आणि अर्थसहाय्य देण्यासाठी मॅरेथॉनच्या माध्यमातून निधी उभारला जाणार आहे, कृषी, आरोग्य, शिक्षण, सामाजिक आदी क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांकरिता विविध कार्यक्रम, तसेच वयोवृद्ध नागरिकांसाठी आरोग्य शिबिर व त्यांना साहित्य पुरवले जात आहे. याशिवाय भारत ऍग्रो इंड्स्ट्रीज फाउंडेशनमार्फत कृषी क्षेत्रातील महिलांना सक्षम करण्यासाठी, सोयाबीन बियाणे देऊन उस्मानाबादमधील विधवा शेतकऱ्यांना मदत, टाटा स्ट्राईव्ह आणि सिंबायोसिस स्किलिंग युनिव्हर्सिटीच्या साहाय्याने तरुण मुलीना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरिता रोजगार मिळवण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण, वृद्ध नागरिकांना सहाय्य आणि मणक्याचा कर्करोग रोखण्यासाठी लसीकरण आदी उपक्रम राबवले जाणार आहेत.” यंदाच्या मॅरॅथॉनची संकल्पना ‘शहरातून गावाकडे’ अशी असून, शहरातील महिलांच्या साथीने ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. मॅरेथॉनचे हे पाचवे वर्ष असून, गेली दोन वर्षे ब्रिजस्टोन या उपक्रमात सहभागी आहे. मगरपट्टा सिटी मैदानावर ८ डिसेंबर २०१९ रोजी ही मॅरेथॉन होणार आहे, असे पराग सातपुते यांनी सांगितले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महिलेवर लैंगिक अत्याचार:पुण्यात आणखी एका भोंदू बाबावर गुन्हा दाखल

पुणे: पती-पत्नीतील मतभेद दूर करून पुन्हा...

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू

आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर...

आमन तांबे :- आधुनिक तमाशा सृष्टीचा ‘बादशाह’

लोककला ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेची ओळख आहे. या परंपरेला...

भारतीय नौदलाची पहिली कमांडर परिषद 2026 नवी दिल्लीत

नवी दिल्ली- भारतीय नौदलाच्या द्वैवार्षिक कमांडर परिषद 2026 ची पहिली...