पुणे : मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आयोडिनची कमतरता : वास्तव आणि संशोधन‘ या विषयावर रसायनशास्त्राच्या प्रा. डॉ. निलिमा राजुरकर यांचे व्याख्यान आयोजिले आहे. येत्या गुरुवारी (दि. २४ ऑक्टोबर) सायंकाळी ६.१५ वाजता भारतीय शैक्षणिक संस्था, मयुर कॉलनी, कोथरुड येथे हे व्याख्यान होणार असून, सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे, अशी माहिती विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. राजेंद्रकुमार सराफ यांनी दिली आहे.
आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड, शरीराची वाढ खुंटणे आणि थायरॉइडच्या समस्यांपासून अनेक व्याधी उद्भवण्याचा धोका असतो. जगभरात आयोडिन कमतरतेमुळे दोनशे कोटींहून अधिक रुग्ण आहेत. त्यामुळेच २१ ऑक्टोबर हा ‘जागतिक आयोडिन न्यूनता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. भारतातही आयोडिन न्यूनतेची तीव्रता लक्षात घेऊन केंद्र शासनाने १९६२ पासून राष्ट्रीय गलगंड नियंत्रण कायक्रम राबविण्यास सुरुवात केली होती. १९९२ मध्ये राष्ट्रीय गलगंड नियंत्रण कार्यक्रमाचे नाव बदलून ‘राष्ट्रीय आयोडिन न्यूनता विकार नियंत्रम कार्यक्रम’ असे करण्यात आले. याबाबत अधिक विस्तृतपणे डॉ. राजूरकर बोलणार आहेत.