मुलांच्या जडणघडणीत पालक-शिक्षकांचा वाटा मोलाचा-अनंत भिडे

Date:

पुणे : “आई आणि शिक्षक मुलाना घडवत असतात. त्यांच्यामुळेच देशाला चांगला व्यवसायिक, खेळाडू, डॉक्टर, इंजिनिअर मिळत असतो. समाज समृद्ध होऊन विकासाच्या दिशेने जात असतो. त्यामुळे मुलांच्या जडणघडणीत पालक व शिक्षकांचे योगदान मोठे आहे. त्याची जाणीव ठेऊन मुलांनी त्यांच्याप्रती कृतज्ञ राहायला हवे,” असे प्रतिपादन मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्राचे संचालक अनंत भिडे यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ पुणे वारजे यांच्या वतीने दिला जाणारा ‘बिझनेस एक्सलन्स अवार्ड’ अनंत भिडे यांना रोटरीचे प्रांतपाल रवी धोत्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मान चिन्ह, मानपत्र, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. प्रसंगी साक्षरता दिनाचे औचित्य साधून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये शिवानी सुतार, मुक्ता जगताप, विकास पाटोळे, वर्षा रांका, गीतांजली बोधनकर, नेहा निरगुडकर, भारती बक्षी, संदीप नाटेकर आदींचा समावेश होता. रोटरी क्लबचे अध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, संजय पडवळ, भारती बक्षी, सुरेखा पाठक आदी उपस्थित होते.
अनंत भिडे म्हणाले, “हा सन्मान माझा नसून माझ्यासोबत कार्य करणाऱ्या असंख्य व्यक्तींचा आहे. व्यावसायानिमित्त विदेशात होतो. भारतात आल्यानंतर समाजकार्य करायला लागलो. ही शिकवण शिक्षकांकडून मिळाली. त्यांनीच योग्य दिशा दिल्यामुळे उद्योग क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात चांगले काम करत आहोत. माझ्या आईचाही यामध्ये मोठा वाटा आहे. तिच्यामुळेच आम्ही चांगले व्यक्ती बनू शकलो. वडीलदेखील आमचे आदर्श आहेत. आईवडील आणि शिक्षकांमुळे आयुष्य समृद्ध झाले असे वाटते.”
रवी धोत्रे म्हणाले, “समाजामध्ये आपण चांगले काम करतो, तेव्हा आपल्या चांगल्या कामांकडे कोणाचेही लक्ष जात नाही. चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला, तर त्यातून इतरांना प्रेरणा मिळते. त्यांच्या पातळीवर ते चांगले काम करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे रोटरी क्लब चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचा सत्कार करते व समाजासमोर आदर्श ठेवते.”
माधवी वझे म्हणाल्या, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींमुळेच आपल्याला प्रेरणा मिळते. त्यामुळे त्यांचा सत्कार व्हायला हवा. अशा व्यक्ती विविध विचारधारांच्या लोकांना एकाच छताखाली आणून त्यांना ते समाजकार्य करण्यास प्रोत्साहित करत राहतात. सूत्रसंचालन डॉ. समीर सावरकर यांनी केले. आभार विनायक पाटील यांनी मानले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मी खोटं एफआयआर केल्याचे सिद्ध झाले तर मला जेल मध्ये टाका.. रोहित पवार आक्रमक

VSR आणि विमान वाहतूक मंत्र्याचे लागेबांधे बारामती - मी...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार:रोहित पवार आक्रमक; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित-युगेंद्र पवार मैदानात:बारामती पोलिस ठाण्यात दाखल; समर्थकांची गर्दी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

दिल्ली पोलिसांवर हिमाचलमध्ये गुन्हा दाखल,हिमाचल पोलीस म्हणाले,इकडे मनमानी नाही चालणार,नाकेबंदी करून थांबवले

शिमला-हिमाचल प्रदेशमध्ये दिल्ली पोलिसांवर बुधवारी एफआयआर (FIR) दाखल करण्यात...