प्रदूषण विरहित विसर्जनासाठी ‘लायन्स क्लब्स’चा पुढाकार

Date:

पुणे : दहा दिवस आनंदाने आपल्या बाप्पाची सेवा केल्यानंतर त्याचे विसर्जन प्रदूषण विरहित व्हावे, यासाठी द लायन्स क्लब्स ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २ संस्थेच्या वतीने पुढाकार घेतला आहे. पर्यावरणाची हानी आणि नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी गणपती विसर्जन काळात (दि ११ व १२ सप्टेंबर २०१९) ‘प्रदूषण विरहित विसर्जनाचा श्रीगणेशा’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ३२ लायन्स क्लब सहभागी होणार आहेत, अशी माहिती लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या जलप्रदूषण विभागाचे जिल्हाध्यक्ष लायन किशोर मोहोळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी लायन सागर भोईटे, अनिल मंद्रुपकर आदी उपस्थित होते.
किशोर मोहोळकर म्हणाले, “प्रांतपाल ओमप्रकाश पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली व किशोर मोहोळकर यांच्या नेतृत्वाखाली ‘प्रदूषण विरहित विसर्जनाचा श्रीगणेशा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून गणपती उत्सव काळात होणाऱ्या पर्यावरण हानीबद्दल जनजागरण केले आहे. मराठी व इंग्रजी भाषेतील सुमारे ८००० पत्रके वाटली. पुणे व पिपरी चिंचवडमध्ये शंभरच्यावर फ्लेक्स लावले आहेत. यात प्रामुख्याने धातूच्या कायम स्वरूपाच्या मूर्ती बनवून घ्या, मूर्ती दान करा असे आव्हान करण्यात आले आहे. प्लास्टिक कलरचे तोटे आणि घरच्या घरी मूर्ती विसर्जन करण्याची पद्धती यावर भर दिला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे घरच्या घरी अमोनियम बायकार्बोनेट (खाण्याचा सोडा) चा वापर करुन विसर्जन करणे, अमोनियम सल्फेटचा वापर करून त्याचे खतात रूपांतर करण्याचे प्रात्यक्षिक आणि अमोनियम बायसल्फेटचे घरोघरी व सोसायट्यामध्ये वाटप करून जनजागृती करणे व प्रोत्साहन देणे, यावर भर दिला आहे.”
सागर भोईटे म्हणाले, “महानगरपालिकेकडून शंभरपेक्षा जास्त सदस्य असलेल्या सोसायटीची यादी घेऊन पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सोसायटीमध्ये प्रात्याक्षिक दाखवण्यात आले. १३० पोती (प्रत्येक पोत्यात २५ किलो पावडर) म्हणजे ३२५० किलो सोडियम बायकार्बोनेट पावडर वाटण्यात आली आहे. म्हणजे प्रत्येक घरगुती गणपती विसर्जनासाठी सरासरी एक किलो पावडर वापरली गेली, तर किमान 2000 गणपतीनचे विसर्जन घरातच होईल आणि २००० किलो पीओपी नदी-तलावात जाणार नाही. परिणामी नदीप्रदूषण कमी होईल. ५० पेक्षा जास्त विदयार्थ्यांनीही मदत केली आहे. विसर्जनानंतर ही पावडर हौदात टाकण्यात येणार आहे.”
अनिल मंद्रुपकर म्हणाले, “श्री फाउंडेशनच्या सहकार्याने पुण्यातील विविध घाटावर गणपती मूर्ती दान देण्यासाठी आव्हान करण्यात येणार आहे. पुण्यातील राजाराम पूल, निलायम टॉकीज घाट, खराडी येथे पाच गाड्या मूर्ती वाहतुकीसाठी उपलब्ध केल्या आहेत. पुण्यातील व पिंपरी चिंचवड येथील विविध घाटावर निर्माल्य गोळा करून त्याचे जागेवरच कंपोस्ट मशीनच्या साह्याने खातात रूपांतर करण्यात येणार आहे.”
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्राजक्ता पटवर्धन यांना भाऊसाहेब स्मृती पाटणकर स्मृती पुरस्कार

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे रविवारी गौरव पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे मराठीतील आद्य...

अडचणींना सामोरे जात फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घ्या : गजाला शेख

गजाला शेख लिखित ‘द फिनिक्स पाथ’ पुस्तकाचे प्रकाशन पुणे :...

शशिकांत सुतारांच्या पुत्राने ठाकरेंना दिला मोठा हादरा, संजय भोसलेंसह भाजपात केला प्रवेश

मुरलीधर मोहोळ,गणेश बिडकर,श्रीनाथ भिमाले यांच्या निवडणूक रणनीतीने महापालिकेच्या राजकारणात...

प्रशांत जगताप स्वार्थी: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुभाष जगताप म्हणाले…

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार , प्रशांत जगताप यांनी...