फुटबॉल स्पर्धेत ‘सूर्यदत्ता’ची हॅट्रिक
पुणे : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या मुळशी तालुकास्तरीय शालेय फुटबॉल क्रीडा स्पर्धेत १९ वर्षाच्या गटात सूर्यदत्ता पब्लिक स्कूलने इंडस इंटरनॅशनल स्कूलचा ४-२ असा पराभव करीत विजयी हॅट्रिक साधली. मुळशी तालुकास्तरीय शालेय फुटबॉल क्रीडा स्पर्धा ब्लू रिडज पब्लिक स्कूल, हिंजवडी येथे नुकत्याच पार पडल्या. यावेळी १९ वर्षाच्या गटातील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत सुर्यदत्ता पब्लिक स्कूलने प्रथम क्रमांक पटकाविला.
अंतिम सामना सूर्यदत्ता पब्लिक स्कूल व इंडस इंटरनॅशनल स्कूल यांच्यात झाला. अटीतटीच्या या सामना शेवटी शून्य गोल बरोबरीत सुटला. त्यानंतर पेनल्टी शूट आउटमध्ये सूर्यदत्ता पब्लिक स्कूलने इंडस इंटरनॅशनल स्कूलचा ४-२ अशा मोठ्या फरकाने पराभव करत मुळशी तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलांच्या गटात सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळविला. सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.