पुणे : पर्यावरण संवर्धनासाठी गेली १४ वर्षे कार्यरत असलेल्या लायन्स क्लब ऑफ पुणे इकोफ्रेंड्सच्या अध्यक्षपदी सुहास कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. कल्पना भालेराव यांची उपाध्यक्षपदी, अरुण कुलकर्णी यांची सचिवपदी, तर महादप्पा अंदुरे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. एमजेएफ लायन सुनिल चेकर यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शपथ दिली. यावेळी इकोफ्रेंड्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष अनिल मंद्रुपकर, रिजनल चेअरपर्सन डॉ. विलास कुलकर्णी, ऍड. बिपीन पाटोळे, शंतनु पेंढारकर, रमेश पसरीजा ,योगेश कदम, गणेश अनेराव यांच्यासह क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते.
सध्या असलेला पाणीटंचाईचा प्रश्न लक्षात घेऊन जलसंवर्धनाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी शाळा-महाविद्यालये, कार्यालये, सोसायट्यांमधून सेमिनार्स, रॅली, व्याख्याने आयोजित करून पाणीबचतीचा जागृती केली जाणार आहे. याशिवाय, वृक्षारोपण, ऑक्सिजन पार्कची निर्मिती, स्वच्छ स्वागेट बसस्थानक, स्वच्छ पुणे शहर, पर्यावरण शिक्षणासाठी कॅच देम यंग हा उपक्रम, वेदर मॉनिटरिंग स्टेशन आणि किचन गार्डनींग असे नाविन्यपूर्ण उपक्रम क्लबच्या वतीने आगामी वर्षात राबविण्यात येणार असल्याचे सुहास कुलकर्णी यांनी सांगितले.