फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाऊंडेशनतर्फे वारकऱ्यांसाठी कायमस्वरूपी शेड्सची उभारणी

Date:

पुणे : ज्ञानोबा-तुकोबाच्या गजरात पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या असून, लाखो वारकऱ्यांचा मेळा आळंदी आणि देहूतून पंढरीच्या वाटेवर चालत आहे. या वारकऱ्यांना पायी वारी दरम्यान उन्हापावसात निवारा मिळावा म्हणून फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाऊंडेशनच्या वतीने वारी मार्गावर तीन कायमस्वरूपी शेड्स उभारले आहेत. यासोबतच इतर सामाजिक उपक्रमांचे लोकार्पण मुकुल माधव फाउंडेशनतर्फे करण्यात आले.

पिराची कुरोळी, लोणी काळभोर आणि वाखरी (पंढरपूर) येथे वारकऱ्यांच्या निवाऱ्यासाठी उभारण्यात आलेल्या या शेड्सचे उद्घाटन निवासी जिल्हाधिकारी अजित देशमुख यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले, गटविकास अधिकारी श्री घोडके, तहसीलदार, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, यांच्यासह फिनोलेक्सचे उपाध्यक्ष बी. आर. मेहता, नितीन कुलकर्णी व मुकुल माधव फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. लोणी काळभोर येथील शेडचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपमुख्याधिकारी संदीप कोहिनकार यांच्या हस्ते झाले. या शेड्समुळे वारकऱ्यांना रात्रीच्या वेळी झोपण्याची सोय होणार आहे. वारीनंतर या शेड्सचा उपयोग गावकऱ्यांना वर्षभर त्यांच्या कार्यक्रमासाठी करता येणार आहे. संबंधित ग्रामपंचायतीकडून त्याची देखभाल केली जाणार आहे.

त्याचबरोबर मुकुल माधव फाउंडेशनने सोलापूर येथील माधव वेल्फेअर फाउंडेशनच्या सहकार्याने २०१८ मध्ये जलसंधारण प्रकल्प सुरु केला होता. त्या प्रकल्पाचा लाभ माढा तालुक्यातील ३२ गावांना होणार आहे. सोलापूरमधील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या ९वी आणि १० वीतील शंभर विद्यार्थिनीना सायकलीचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे पालकांकडून आपल्या मुलींना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. पुण्यातल्या वडगाव आनंद येथील विद्यार्थ्यांना जेवण्यासाठी स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी पक्के शेड उभारले आहे. रुग्णांसाठी केईएम रुग्णालयात मासिक मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन केले. त्यात २६ रुग्णांवर उपचार करण्यात आले.

…अन भरली आजीबाईंची शाळा 

पुण्यापासून २०० किमी अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील वडाची वाडी गावात आजीबाईची अनोखी शाळा भरली. ५० ज्येष्ठ नागरिक महिलांना साक्षर करण्यासाठी मुकुल माधव फाउंडेशनने हा पुढाकार घेतला असून, त्यात त्यांना अक्षर ओळख व मूलभूत शिक्षण दिले जाणार आहे. सगळ्या आजींना गणवेश दिल्यामुळे ही आजीबाईचा शाळा सर्वांचे लक्ष वेधत आहे. यासह खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भधारणेच्या काळात आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळावी, याचे १२२ आशा व एएनएम नर्सेसना प्रशिक्षण देण्यात आले, असे मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जर्मनीतील शिक्षणा करीता मार्गदर्शन

पुणे, १३ मार्च २५ - सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल...

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

पुणे दि. १३: समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती...

बंदिशींद्वारे भारतीय स्त्री शक्तीचा सन्मान

भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने उर्जा' : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा...